दिन विशेष 02 जानेवारी – महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिन

0

महाराष्ट्र पोलीस दलाचा 59 वा वर्धापन दिन – 2 जानेवारी

Maharashtra Police Raising Day

हे आकारमानाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. राज्यात 36 जिल्हे असून, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत ‘महाराष्ट्र पोलीस’ आज 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा 59 वा वर्धापन दिन आहे.

महाराष्ट्र पोलीस दल इतिहास –
महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास पाहिला तर पहिली नोंद आढळते ती 1661 साली. त्या वेळी पोर्तुगीजांनी पोलिस चौकीची स्थापना करून भागात कायदेशीर अंमलबजावणीची मूलभूत संरचना तयार केली. त्यानंतर 1672 साली सात बेटांचे रक्षण करण्यासाठी भंडारी ब्रिगेड नावाची फौज नेमली गेली. हीच फौज अधिक शिस्तबद्ध होत महाराष्ट्र पोलीस दलाचा उगम झाला.

1936 मध्ये, सिंध प्रांत पोलिस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले. पुढे 1947 मध्ये, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून बॉम्बे राज्य पोलिस असे ठेवले गेले. राज्य पुनर्गठन अधिनियम,1956 नंतर, मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी होऊन, गुजरात पोलिस, म्हैसूर पोलिस (नंतर नाव बदलून कर्नाटक पोलिस) आणि महाराष्ट्र पोलिस अशी विभागणी झाली. अखेर 2 जानेवारी 1961 साली महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृतरीत्या स्थापना झाली.

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलिस दलाचा स्थापना दिन म्हणून ओळखला जातो. सध्याचे महासंचालक संजीव दयाळ यांच्या पुढाकारातून दोन वर्षांपासून हा ‘स्थापना दिन’ साजरा होत आहे. यामुळेच आज राज्यात विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here