दिन विशेष 12 जानेवारी – राजमाता जिजाऊ जन्म दिवस आणि राष्ट्रिय युवा दिवस

0

दिनविशेष 12 जानेवारी – राजमाता जिजाऊ जन्म दिवस आणि राष्ट्रिय युवा दिवस

1) राजमाता जिजाऊ जन्म दिवस 

January 6 – Jija Mata Born Day

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील महेकर तालुक्यातील शिंदखेड गावातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात 12 जानेवारी 1598 रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला.

जिजाऊंंना चार मोठे भाऊ होते. माहेरी त्यांनी त्यांनी राजनीती, युद्धकलेत प्रावीण्य मिळवले. याचा उपयोग पुढे शिवरायांना शिक्षण देण्यासाठी कामास आला.

जिजाऊ आदर्श माता होत्या. आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचा काम जिजामातेने छ. शिवाजी महाराजांवर केल.

माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले.

2) राष्ट्रिय युवा दिवस /  स्वामी विवेकानंद जन्म दिवस

12 जानेवारी ही देशातील महान तत्त्ववेत्ता आणि जगातील भारताच्या अध्यात्माचे आधारभूत स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला होता. राष्ट्रीय युवा दिन देखील दरवर्षी 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here