सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 2024-25
Services Preparatory Institute (SPI) Nashik, Apply Online for Boys and Girls Candidates Admission Process started 2024-25
संरक्षण दलामध्ये अधिकारी म्हणून जसे UPSC, NDA आणि INA मध्ये महाराष्ट्रातील युवक-युवतीना मोठ्या संख्येने जाता यावे, यासाठी मुला-मुलींचे NDA तील प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी मुलांसाठी सरकारी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजी नगर स्थापन केलेली आहे आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2021 मध्ये घेतला आहे. त्यातंर्गत मुलींसाठी देशातील पहिली सरकारी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था नाशिकमध्ये मंजूर झाली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील संस्थेत मुलांची 48वी तुकडी आणि नाशीक येथील संस्थेत मुलींची दुसऱ्या तुकडी करिता प्रवेश प्रक्रिया जून 2024 पासून सुरू होणार आहे, त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत.
शिक्षण संस्था :- नाशिक / छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र)
एकुण जागा :- जागा निर्दिष्ट नाहित
कोर्सचे नाव :- सैनिकी सेवापूर्व शिक्षण प्रवेश 2024-25
शैक्षणिक पात्रता :- सध्या दहावीत शिकत असणारे विद्यार्थी मार्च / एप्रिल /मे 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परिक्षा / दहावी परीक्षेला बसणारा / बसणारी असावा, जून 2024 मध्ये अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.
वयोमर्यादा :- विद्यार्थ्यांचा / उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 या दरम्यान झालेला असावा
उंची :- मुलांसाठी-157 सेमी आणि मुलींसाठी 152 सेमी
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
लेखी परिक्षा दिनांक :- 28 एप्रिल 2024
अंतिम दिनांक :- 29 फेबृवारी 2024 10 मार्च 2024 (06:00 PM)
10 वी बोनाफाईड नमुना :- CLICK HERE
Important Links | |
Follow Facebook Page | Click Here |
Follow Instagram Channel | Click Here |
Subscribe YouTube Channel | Click Here |
Join WhatsApp Group | Click Here |
Join Telegram Channel |
Click Here |