छाननी अर्ज प्रक्रिया सुरु – महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभाग (MAHA Bhulekh) 1013 जागांसाठी भरती 2021

0

 

छाननी अर्ज प्रक्रिया सुरु – महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभाग (MAHA Bhulekh) 1013 जागांसाठी भरती 2021

Department of Land Records Maharashtra, (MAHA Bhulekh), Apply Online for 1013 Surveyor and Clerk Posts recruitment 2021

 

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभाग (MAHA Bhulekh) मध्ये 1013 जागांसाठी भरती 2021 जाहिरात पहा – CLICK HERE

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भुकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक 09/12/2021 रोजी जाहीरात प्रसिद्ध करुन दिनांक 09/12/2021 ते दिनांक 31/12/2021 अखेर ऑनलाईन अर्ज मागविणेत आले होते. सदर भरतीप्रक्रिया ज्या कंपनी मार्फत राबविण्यात येणार होती त्या कंपनीद्वारे शासनाच्या इतर विभागात आयोजित केलेल्या विविध परिक्षांमध्ये झालेले गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे या विभागाकडून केवळ उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सदर कंपनीद्वारे राबविण्यात आली. परंतु ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने ज्या उमेदवारांनी उक्त कालावधीत भूमि अभिलेख विभागाचे पदभरतीकामी अर्ज सादर केले आहे, अशा उमेदवारांकडून छाननी अर्ज (Scrutiny Form) भरुन घेण्यात येत आहेत. छाननी अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 28/02/2022 सकाळी 10:00 वाजलेपासून दिनांक 09/03/2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत असेल.

तरी, यापुर्वी उपरोक्त परिक्षेकरीता शुल्कासह अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील सुचनांनुसार छाननी अर्ज भरावा. जे उमेदवार वर नमुद कालावधीमध्ये छाननी अर्ज भरणार नाहीत त्यांचा अर्ज रद्द समजणेत येईल

Advt No :- 

एकुण जागा :- 1013 जागा

पदाचे नाव :- भूकरमापक तथा लिपिक
1 ) पुणे विभाग – 163
2 ) कोकण विभाग, मुंबई – 244
3 ) नाशिक विभाग – 102
4 ) औरंगाबाद विभाग – 207
5 ) अमरावती विभाग – 108
6 ) नागपूर विभाग – 189

शैक्षणिक पात्रता :- ज्यां अगोदर अर्ज भरलेला आहे आणि रजिस्ट्रेशन ID मिळालेला आहे असे उमेद्वार – डिप्लोमा/पदवी/पदव्यूत्तर पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी) किंवा (10वी पास + ITI (सर्वेक्षक)), टायपिंग (मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि.)

छाननी अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – खालील छाननी अर्ज भरण्याकरिता सविस्तर मार्गदर्शक सुचना पाहुन खालील दिलेला लिंक द्वारा छाननी अर्ज भरा.

छाननी अर्ज प्रक्रिया कालावधी दिनांक :- 28/02/2022 (10:00 AM) ते 09/03/2022 (23:59PM)

छाननी अर्ज भरण्याकरिता सविस्तर मार्गदर्शक सुचना पहा :- CLICK HERE

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here