RTE प्रवेश 2023 प्रवेशाला सुरुवात, तुमच्या नंबर कसा चेक करणार ?  (RTE Admission 2023 Lottery Draw) 

0
MAHARASHTRA

RTE प्रवेश 2023 प्रवेशाला सुरुवात, तुमच्या नंबर कसा चेक करणार ? (RTE Admission 2023 Lottery Draw) 

School education and sport department Government of Maharashtra RTE 25% Reservation Candidates Admission Process 2023

 

प्रवेशप्रक्रियेचे नाव :- शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग RTE 25% आरक्षण – महाराष्ट्र ऑनलाइन प्रवेश 2023-24

संपूर्ण महाराष्ट्रात RTE अंतर्गत 8823 शाळा येतात. या शाळांमध्ये 1,01,846 जागा रिक्त असुन, यासाठी एकूण अर्ज 3,64,413 जणांनी केले होते. त्यापैकी 94,700 जणांची निवड झाली आहे. 81129 विद्यार्थ्यांची नाव प्रतीक्षा यादीत आहेत. महाराष्ट्रात RTE 2023-24 सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असुन, 05 एप्रिल 2023 रोजी लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची नावं जाहीर झाल्यानंतर 12 एप्रिल 2023 रोजी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर संदेश प्राप्त झाला आहे. परंतु पालकांनी फक्त SMS वर अवलंबून न राहता RTE पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी.

RTE अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी काय करायचे आहे, खालील स्टेप्स
1) खाली दिलेल्या वेबसाईटवर verification committee या tab वर करुन, शाळेच्या जवळील पडताळणी केंद्रावर जावे.
2) RTE पोर्टलवरील हमीपत्र , एलॉटमेंट लेटर (Allotment Letter) आणि अर्जात नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या 2 प्रती साक्षांकित/मूळ प्रती घेऊन पडताळणी समितीकडे जावे.
3) पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
4) पडताळणी समितीने कागदपत्रे तपासल्यानंतर योग्य असल्याचा शेरा दिल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. कागदपत्राअभावी पडताळणी समितीने अपात्र शेरा दिल्यास संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश नाकारण्यात येईल.
5) प्रवेशपत्र आणि पडताळणी केलेली कागदपत्रे घेऊन पालकांना निवडलेल्या शाळांमध्ये पाठविण्यात येईल. निवडलेली शाळा ही पालकांकडून कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे मागणार नाहीत किंवा प्रवेश नाकारणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
6) शाळेमध्ये प्रत्यक्ष प्रवेश 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान मिळणार आहे.

कागदपत्र तपासण्याची मुदत कालावधी – 13 एप्रिल 2023 पासून 25 एप्रिल 2023

 

 

 

RTE प्रवेश 2023 ऑनलाइन नोंदणी 2023 (RTE Admission 2023 Online Registration 2023)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here