MPSC मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, 13 सप्टेंबरऐवजी 20 सप्टेंबरला परीक्षा

0

MPSC मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, 13 सप्टेंबरऐवजी 20 सप्टेंबरला परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 23 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार राज्यसेवेचे पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार होती. करोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता हि परिक्षा 13 सप्टेंबर ऐवजी 20 सप्टेंबरला घेण्यात येणार आहे, तसेच 13 सप्टेंबरला NEET परीक्षा देशभरात होत असल्याने दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यास उपकेंद्रांची मागणी व इतर प्रशाकासकीय अडचणी यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, MPSC कडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे.

यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुधारित वेळापत्रक17 जून रोजी जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर होणार होत्या. मात्र, 13 सप्टेंबर रोजी देशभरात नीट परीक्षा होणार असून त्याच दिवशी राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार होती. त्यामुळे एमपीएससीने पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

MPSC आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरता प्रवेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने परीक्षा उपकेंद्रांची कमतरता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. ही अडचण लक्षात घेत राज्य पातळीवर घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here