मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे

     आपली तुलना कोणत्याही देशाशी तुलना करणं योग्य ठरणार नाही. पण जगातील बलाढ्य देशांशी तुलना करता आपण अतिशय चांगल्या स्थितीत आहोत. महिना दीड महिन्यापूर्वी बरेचसे देश आपल्या बरोबरीत होते. मात्र आत्ता तिथे कोरोनाचे रुग्ण २५ ते ३० पट आहेत. मृतांचा आकडा हजारोंच्या घरात आहे. आपण योग्य वेळी निर्णय घेतले नसते, तर आपली स्थिती काय असली असती, याची कल्पनाही करवत नाही. मागील दिवसांमधील स्थिती पाहिल्यास, आपण जे केलंय ते योग्य होतं याची खात्री पटते. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचा फायदा देशाला झाला. त्याची आर्थिक किंमत आपण चुकवली. पण देशाच्या नागरिकांच्या जीवापुढे ती किंमत काहीच नाही. अतिशय कमी संसाधनं असताना आपण उत्तम कामगिरी केली. त्याची जगभरात चर्चा होत आहे, अशा शब्दांत मोदींनी देशवासीयांनी दाखवलेल्या संयमाचं कौतुक केलं.

    कोरोनाविरुद्धच्या लढ्यात एकजुटीनं लढत असल्याचं म्हणत हीच बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. या संकटकाळात देश मोठ्या मजबुतीनं लढतोय. देशवासीयांची तपस्या, त्यागामुळेच हे शक्य झालंय. कोरोना नियंत्रणात आणण्यात सगळ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. देशातली जनता मोठ्या कष्टानं देशाला वाचवतेय. या काळात देशवासीयांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्यांची मला जाणीव आहे. मात्र अडथळे येऊनही सगळे जण कर्तव्य बजावत आहेत. बाबासाहेब आंबेजकर यांची आज जयंती आहे. आपण करत असलेले सामूदायिक प्रयत्न हीच बाबासाहेबांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे, असं मोदींनी म्हटलं.

   करोनाची ५५० प्रकरणे होती, तेव्हाच भारताने २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला. समस्या वाढण्याचा विचार केला नाही. समस्या दिसताच वेगाने निर्णय घेऊन रोखण्याचा प्रयत्न केला. हे असे सकंट आहे ज्याची कुठल्या देशाबरोबर तुलना करणे योग्य नाही. जगातील सामर्थ्यशाली देशांमध्ये करोनाचे आकडे पाहिले तर त्या तुलनेत भारतात चांगली स्थिती आहे.

🔸भारताच्या तुलनेत इतर देशात करोनाच्या ३० टक्के जास्त केसेस आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउनचा देशाला मोठा फायदा झाला. आर्थिक दृष्टीन विचार केल्यास खूप मोठी किंमत चुकवावी लागली. पण देशवासियांच्या प्राण वाचवणे महत्वाचे होते.

🔹 भारतात तीन में पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

आपल्याल तीच शिस्त पाळायची आहे. माझी सर्व देशवासियांना प्रार्थना आहे. कुठल्याही परिस्थिती आपल्याला करोनाला आता दुसऱ्या क्षेत्रात पसरु द्यायचे नाही. करोनामुळे कुठेही मृत्यू झाल्यास चिंता वाढली पाहिजे.

🔸पुढील एक आठवडा लॉकडाउनचे नियम कठोर करणार. प्रत्येक जिल्ह्यावर, राज्यावर आमचे बारीक लक्ष असेल. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाच मूल्यांकन केलं जाणार, जे करोनाला आळा घालतील तिथे नियम थोडे शिथिल केले जातील. लॉकडाउनचे नियम मोडले. करोना तुमच्या भागात पोहोचला लगेच परवानगी मागे घेतली जाईल. उद्या सरकारकडून विस्तृत गाईडलाइन जारी केली जाईल.

  पंतप्रधान मोदींनी सांगितली सप्तपदी

१ घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या, ज्यांना आधीपासून आजार आहेत, त्यांच जास्त काळजी घ्या.

२ लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषेचं पालन करा-

३ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढा, पाणी यांचे सेवन करा.

४ करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य सेतू मोबाइल अँप डाऊनलोड करा.

५ शक्य असेल तितक्या गरीब कुटुंबांजी काळजी घ्या,

६ तुमचा व्यवसाय, उद्योग असेल तर संवेदना ठेवा नोकरीवरुन काढू नका.

७ देशातील करोना योद्धयांचा सन्मान करा, त्यांचा गौरव करा

आरोग्य सेतू अँप :- डाऊनलोड करा

🔸 महिन्यापूर्वी जे देश भारताच्या बरोबरीत होते, त्या देशांमध्ये भारतापेक्षा २५-३० टक्के जास्त बाधित झालेत, हजारो लोकं प्राणांना मुकले आहेत. भारतानं योग्य वेळी चांगले निर्णय घेतले नसते तर भारताची स्थिती काय असती याचा विचार करवत नाही.

🔹 कमी स्त्रोत असताना भारतानं, जो मार्ग निवडला त्याची जगभरात चर्चा होणं स्वभाविक आहे. देशातल्या राज्यांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अत्यंत चांगलं काम केलंय. या सगळ्या प्रयत्नांनंतरही करोना ज्याप्रकारे जसा पसरतोय, त्यानं सगळ्यांना सतर्क केलं आहे.

🔸 “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेलं नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन तीन मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

🔹देशवासी एखाद्या योद्ध्याप्रमाणे कार्य करत आहेत. तुम्हाला किती त्रास होतो आहे याची मला कल्पना आहे. तुम्हीच भारताला वाचवलंय, मी सर्वांना नमन करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here