01 ऑगस्ट दिनविशेष

01 ऑगस्ट दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

01 ऑगस्टला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

ख्रिस्त पूर्व 10 – रोमन सम्राट क्लॉडियस यांचा जन्म.
1744 – लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे यांचा जन्म.
1835 – कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म.
1869 – ब्रिटीश कालीन भारतातील आग्रा व अवध या संयुक्त प्रांतांचे पहिले गव्हर्नर सर स्पेन्सर हार्कोर्ट बटलर यांचा जन्मदिन.
1882 – भारतरत्‍न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म.
1899 – पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा जन्मदिन.
1913 – सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक भगवान दादा यांचा जन्मदिन.
1915 – प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार श्रीकृष्ण जनार्दन जोशी यांचा जन्मदिन.
1920 – प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन समाजसुधारक, लोककवी, लेखक, शाहीर, कथा व कादंबरीकार तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन.
1933 – ‘मीनाकुमारी’ या नावाने प्रसिद्ध असेलेल्या प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री, गायक आणि कवी महजबीन बानो यांचा जन्मदिन.
1948 – मार्वल स्टुडिओ चे संस्थापक एव्ही अराद यांचा जन्म.
1952 – माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू यजुर्वेंद्र सिंग यांचा जन्मदिन.
1955 – क्रिकेटपटू समालोचक अरुण लाल यांचा जन्म.
1969 – इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहॅम थॉर्प यांचा जन्म.

01 ऑगस्टला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1137 – फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचे निधन.
1591 – मुघल शासक बादशाहा अकबर यांच्या दरबारातील प्रसिद्ध कवी उर्फी शीराजी यांचे निधन.
1863 – पंजाब प्रांताचे महाराज रणजीत सिंह यांची पाचवी पत्नी तथा महाराज दलीप सिंह यांची आई ज़िन्दाँ राणी यांचे निधन.
1913 – भारतीय हिंदी भाषेतील लोकप्रिय कादंबरीकार व लेखक देवकी नंदन खत्री यांचे निधन.
1920 – भारतीय राष्ट्रवादी राजकारणी, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि स्वातंत्र्यसैनिक जहालमतवादी नेते लोकमान्य टिळक उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचे निधन.
1999 – प्रख्यात भारतीय इंग्रजी व बंगाली भाषेचे लेखक व विद्वान नीरद चंद्र चौधरी यांचे निधन.
2000 – भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखक, कवी व चित्रपट गीतकार अली सरदार जाफरी यांचे निधन.
2005 – सौदी अरेबियाचा राजा फहाद यांचे निधन.
2008 – पंजाबमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व राजकारणी तसचं, पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य हरकिशनसिंग सुरजीत यांचे निधन.
2008 – माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू अशोक विनू माणकड यांचे निधन.
2008 – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशनसिंग सुरजित यांचे निधन.

01 ऑगस्टच्या महत्वपूर्ण घटना

1774 – जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
1876 – कोलोरॅडो अमेरिकेचे 38 वे राज्य बनले.
1914 – जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारून पहिल्या महायुद्धाला सुरुवात केली.
1920 – महात्मा गांधींनी स्वराज्य व संपूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने असहकार चळवळ सुरू केली होती, जालियनवाला बाग हत्याकांड घटनेमुळे दु:खी होऊन इंग्रज सरकारने दिलेला ‘केसर ए हिंद’ हा किताब परत केला.
1936 – जर्मन हुकुमशहा शासक एडॉल्फ हिटलर यांनी बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिक खेळांचे अध्यक्षस्थान भूषविले.
1944 – पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
1947 – भारत पाकिस्तानच्या फाळणी नंतर लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे गव्हर्नर जनरल बनले तर मोहम्मद अली जिन्ना हे पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनले.
1956 – दुर्बा बॅनर्जी या इंडियन एअरलाइन्सच्या तसचं भारतातील पहिल्या महिला वैमानिक बनल्या.
1957 – भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था, भारतीय प्रकाशन गृह नॅशनल बुक ट्रस्ट ची स्थापना म्हणून करण्यात आली.
1958 – आचार्य विनोबा भावे यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
1960 – इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
1981 – अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.
1994 – भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू करण्यात आली.
1996 – कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
2004 – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाची स्थापना आणि त्याचे उद्घाटन 3 ऑगस्ट 2004 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केले.
2008 – अकरा पर्वतारोहणांचा K2 या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला.