26 जुलै दिन विशेष

26 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

कारगिल विजय दिन – 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
_____________________________________________

 

26 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1844 – भारतीय कलकत्ता येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व कलकत्ता विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू गुरूदासदास बॅनर्जी यांचा जन्मदिन.
1856 – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म.
1875 – स्विस मानसोपचार तज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ कार्ल गुस्टाफ युंग यांचा जन्मदिन.
1893 – भारतीय शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेरच्या घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित कृष्णराव शंकर यांचा जन्मदिन.
1894 – ब्रिटीश लेखक व तत्त्वज्ञ तसचं, काल्पनिक कथा व कादंबरीकार अ‍ॅल्डॉस लिओनार्ड हक्सले यांचा जन्मदिन.
1914 – प्रसिद्ध भारतीय कवयित्री विद्यावती कोकीळ यांचा जन्मदिन.
1939 – ऑस्ट्रेलियाचे 25वे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचा जन्म.
1942 – स्लोव्हेकियाचे पंतप्रधान व्लादिमिर मेसियर यांचा जन्म.
1949 – थायलंडचे पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचा जन्म.
1986 – प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री मुग्धा गोडसे यांचा जन्मदिन

26 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

811 – बायझेन्टाईन सम्राट निसेफोरस यांचे निधन.
1380 – जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन.
1843 – टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन.
1867 – ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन.
1891 – भारतीय वंशाचे पहिले आधुनिक प्राच्यविद्या संशोधक आणि बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन.
1967 – भारतातील प्रसिद्ध इतिहास, संस्कृत, कला आणि साहित्यांचे अभ्यासक व दिल्ली येथील राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयाचे सह-संस्थापक वासुदेव शरण अग्रवाल यांचे निधन.
2009 – प्रसिद्ध भारतीय सितार वादक, शैक्षणिक, चित्रपट व नाट्य संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन.
2005 – माजी कॅनडीयन हॉकीपटू जीन गिलेस मारॉटे यांचे निधन.
2015 – भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन.

26 जुलै महत्वपूर्ण घटना

1509 – महाराज कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याचे पुनरुत्पादन करण्यास सुरुवात केली.
1745 – इंग्लंडमधील गिल्डफोर्ड या ठिकाणी महिला क्रिकेट संघाचा पहिला सामना झाला.
1876 – ब्रिटीश कालीन भारतातील कलकत्ता शहरात इंडियन असोसिएशन ची स्थापना करण्यात आली होती.
1788 – न्यूयॉर्क अमेरिकेचे 11वे राज्य बनले.
1891 – फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.
1953 – फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ 26 जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.
1956 – जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
1963 – सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
1965 – मालदीवला युनायटेड किंग्डम आणि इंग्लंड पासून स्वातंत्र्य.
1998 – बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.
1999 – क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.
1999 – भारताने कारगिल युद्ध जिंकले.
2005 – मुंबई परिसरात 24 तासांत सुमारे 995 मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.
2005 – अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले अंतरीक्ष यान डिस्कव्हरी चे प्रक्षेपण केले.
1994 – सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.