24 जुलै दिन विशेष

24 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

24 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1786 – फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म
1802 – फ्रेंच लेखक अलेक्झांड्रे ड्युमास यांचा जन्मदिन.
1851 – जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक शॉटकी यांचा जन्म.
1911 – भारतीय बासरीवादक आणि संगीतकार व उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचे शिष्य पन्नालाल घोष यांचा जन्मदिन.
1911 – पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित हैदराबाद मुक्तीसंग्राम चळवळीचे पुढारी व स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्मदिन.
1924 – प्रसिद्ध भारतीय गजल गायक व उर्दू शायर(कवी) नाज़िश प्रतापगढ़ी यांचा जन्मदिन.
1937 – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक मनोज कुमार यांचा जन्म.
1945 – पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय दानशूर उद्योगपती, गुंतवणूकदार, अभियंता, विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष अझीम हशिम प्रेमजी यांचा जन्मदिन
1969 – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका जेनिफर लोपेझ यांचा जन्म.
1985 – पद्मश्री, पद्मभूषण, राजीव गांधी खेलरत्न, पुरस्कार विजेता उत्कृष्ट भारतीय बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी यांचा जन्मदिन.

24 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1947 – नोबल पुरस्कार वेजेता प्रसिद्ध ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ, अणूतील न्युट्रॉनच्या कणांचा शोध लावणारे सर जेम्स चाडविक यांचे निधन
1980 – प्रसिद्ध भारतीय बंगाली व हिंदी भाषिक चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक उत्तम कुमार यांचे निधन.
1980 – इंग्लंड देशांतील प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट अभिनेता, विनोदकार आणि गायक पीटर सेलर्स यांचे निधन.
2012 – प्रसिद्ध अमेरिकन शरीरशास्त्र व जीवशास्त्रशास्त्र विषयाचे प्राध्यापक व सिटीस्कॅन यंत्राचे जनक रॉबर्ट स्टीव्हन लेडले यांचे निधन.
2018 – माजी ब्रिटीश अष्टपैलू क्रिकेटपटू जॉन मुरै यांचे निधन.

24 जुलै महत्वपूर्ण घटना

1567 – स्कॉटलंडची राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे 01 वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.
1704 – ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.
1823 – चिली देशांतील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली.
1870 – अमेरिकेमध्ये देशांतर्गत रेल्वे सेवा सुरु करण्यात आली.
1911 – हायराम बिंगहॅम 3 रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
1932 – रामकृष्ण मिशन मठाची स्थापना करण्यात आली.
1943 – दुसरे महायुद् ऑपरेशन गोमोरा – दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले.
1969 – चंद्र मोहिमेनंतर अमेरिकन चंद्रयान अपोलो – 11 पृथ्वीवर सुखरूप उतरले.
1974 – वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिर्चड निक्सनने स्वत:विरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
1990 – इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमव करण्यास सुरूवात केली.
1991 – भारताचे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा महत्वपूर्ण अर्थसंकल्प संसदेत सदर केला.
1997 – भारताचे माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वतंत्रता सैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1997 – बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
1997 – माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
1998 – परकीय चलन नियमन कायदा (FERA) च्या जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा महत्व्पून निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला.
2000 – अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळपटू विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची सुब्बरमन विजयलक्ष्मी या आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर व महिला ग्रँडमास्टरची फीड पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्या.
2001 – टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत शिखा टंडनने फ्रीस्टाइल प्रकारात 100 मी. अंतर 59.96 सेकंदांत पार केले.
2004 – इटली देशाने भारतीय पर्यटकांसाठी सात नवीन वीजा कॉल सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला.
2005 – लान्स आर्मस्ट्राँगने टूर-डी-फ्रान्स ही सायकल शर्यत सलग सातव्यांदा जिंकली.