20 जुलै दिन विशेष

20 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

नील आर्मस्ट्राँग – 20 जुलै, 1969 रोजी, नील आर्मस्ट्राँग शिडीने चंद्राच्या जमिनिवर उतरत असतांना त्यांनी पहिले पाऊल चंद्रावर ठेवले, तेव्हा ते पुढील शब्द पिढ्यापिढ्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या जातील अशा शब्दांत बोलले – “मनुष्यासाठी ही एक छोटी पायरी आहे.
_____________________________________________

 

20 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

इ.स. पूर्व 356 – मॅसेडोनिया प्रांतातील प्राचीन ग्रीक देशाचे सम्राट व आर्जेड राजघराण्याचे सदस्य राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्मदिन.
1822 – जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचा जन्म
1836 – क्लिनिकल थर्मामीटरचा शोध लावणारे प्रसिद्ध ब्रिटीश चिकित्सक व ब्रिटीश मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचा जन्मदिन.
1919 – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म.
1921 – भारतीय बनारस घराण्यातील नामवंत तबलावादक पंडित सामता प्रसाद पंडित यांचा जन्मदिन.
1929 – हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्रकुमार यांचा जन्म.
1949 – भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता हिंदी चित्रपट अभिनेते व रंगमंच कलाकार नसीरुद्दीन शाह यांचा जन्मदिन.

20 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1866 – प्रख्यात जर्मन गणितज्ञ बर्नार्ड रीमैन यांचे निधन.
1922 – रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांचे निधन.
1937 – रेडिओ ट्रान्समिशन यंत्राचा शोध लावणारे प्रख्यात इटालियन संशोधक व इलेक्ट्रिकल अभियंता गुल्येल्मो मार्कोनी यांचे निधन.
1951 – जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन.
1965 – क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन.
1972 – अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन
1973 – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचे निधन.
1995 – शास्त्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९३५)
भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश व भारतातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी विराजमान होणाऱ्या पहिल्या ब्रिटीश महिला अन्ना चांडी यांचे निधन.
2013 – भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान यांचे निधन.
2020 – भारतीय राजकारणी व सुप्रसिद्ध सामाजिक न्याय नेते राम अवधेशसिंग यादव यांचे निधन.
2020 – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते ओडिया चित्रपट अभिनेते विजय मोहंती यांचे निधन.
2020 – भारतीय मुस्लिम विद्वान व सहारनपुरमधील मजहीर उलूमचे कुलगुरू सलमान मझिरी यांचे निधन.

20 जुलै महत्वपूर्ण घटना

इ.स. 1296 – खिलजी घराण्याचे शासक अल्लाउद्दीन खिलजी यांनी स्वत:ला दिल्ली चा राजा म्हणून घोषित केलं.
1402 – तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
1807 – निकेफोरे निएप्स यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
1828 – मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
1871 – ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.
1903 – फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडीची निर्मिती होऊन कारखान्याबाहेर पडली.
1905 – ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे वाइसराय लॉर्ड कर्झन यांच्या द्वारा करण्यात आलेल्या बंगालच्या फाळणीस भारताच्या सचिवाने देखील मंजुरी दिली.
1908 – बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.
1926 – मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
1944 – दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला.
1949 – इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.
1960 – साली श्रीलंका देशांतील पंतप्रधान पदी विराजमान होणाऱ्या सिरिमावो भंडारनायके या जगातील पहिल्या महिला ठरल्या.
1969 -अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. त्यानंतर लगेच दुसरे अमेरिकन अंतराळवीर बाज एल्ड्रीन उर्फ एडविन एल्ड्रीन हे चंद्रावर उतरणारे दुसरे मानव ठरले.
1976 – अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पाठविलेले मंगळावर प्रथमच व्हायकिंग – 01 हे मानवरहित अंतराळयान उतरले.
1989 – म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.
2000 – अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.
2015 – पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.