17 मार्च दिन विशेष

17 मार्च दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

17 मार्चला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1864 – भारतीय अभियंता, आणि राजकारणी जोसेफ बॅप्टिस्टा यांचा जन्म दिन.
1909 – पद्मश्री पुरस्कार विजेते भारतीय भाषातज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्मदिवस.
1927 – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास सावरकर यांचा जन्मदिन.
1946 – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्मदिन.
1962 – भारतीय अमेरिकी अंतरीक्ष यात्री कल्पना चावला यांचा जन्मदिन.
1975 – भारतीय अभिनेता गायक, पुनीथ राजकुमार यांचा जन्म.
1990 – भारतीय बॅडमिंटनपटू साइना नेहवाल यांचा जन्मदिवस.

17 मार्चला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1210 – आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्हातील मत्स्येन्द्र्गड येथे समाधी घेतली.
1882 – आधुनिक मराठी गद्द्याचे जनक, ग्रंथकार, केसरी चे संस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.
1910 – सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी अनुताई वाघ यांचे निधन.
1937 – बडोदा संस्थानचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचे निधन.
1956 – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेत्या आयरिन क्यूरी यांचे निधन.
1957 – फिलिपाईन्स देशाचे सातवे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचे निधन.
1977 – भारतीय शास्त्रीय संगीत गायिका सिद्धेश्वर देवी यांचे निधन.
2000 – पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे यांचे निधन.
2016 – इंग्लंड देशातील इंग्रज जादुगार पॉल डॅनियल्स यांचे निधन

17 मार्चच्या महत्वपूर्ण घटना

1527 – खांडवा येथील युद्धात मुघल सम्राट बाबर यांनी चित्तौडगढचे शासक राणा संग्राम यांचा पराभव केला.
1782 – इस्ट इंडिया कंपनी आणि मराठा शासक यांच्यात सालाबाईचा तह झाला.
1845 – ब्रिटीश शोधक आणि उद्योगपती स्टीफन पेरी यांनी रबर बँडसाठी पेटंट प्राप्त झाले होते.
1944 – पुण्याजवळील लोणावळा येथे भारतीय नौदल अभियांत्रिकी संस्था आय. एन. एस. शिवाजीची स्थापना करण्यात आली.
1957 – अमेरिकन उपग्रह व्हॅनगार्ड 1 हा सौर विद्युत शक्ती असलेला पहिला उपग्रह असून, त्याचे प्रक्षेपण करण्यात आले.
1969 – गोल्ड मायर या इस्रायेलच्या पहिला महिला प्रधानमंत्री बनल्या.
1987 – भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी क्रिकेट खेळापासून सन्यास घेतला.
1997 – मुंबईमध्ये वातानुकूलित टॅक्सीसेवेला सुरुवात झाली