15 जुलै दिन विशेष

15 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

जागतिक युवा कौशल्य दिन – 2014 मध्ये, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण यांचे महत्त्व आणि स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित इतर कौशल्यांच्या विकासाविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो.
_____________________________________________

15 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1611 – मुघल साम्राज्याचे ज्येष्ठ सेनापती आणि आमेर राज्याचे राज्यकर्ता महाराजा जयसिंग यांचा जन्मदिन.
1783 – पर्शियन भारतीय व्यापारी व दानवीर जमशेदजी जीजाभाई यांचा जन्मदिन.
1840 – स्कॉटिश इतिहासकार, सांखिकीतज्ञ, संकलक आणि भारतीय नागरी सेवेचा सदस्य विलियम विलसन हन्टर यांचा जन्मदिन.
1909 – भारतीय स्वतंत्रता सेनानी, मुत्सदी, वकील व आंध्रप्रदेश राज्याच्या पहिल्या महिला राजनेता दुर्गाबाई देशमुख यांचा जन्मदिन.
1922 – नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ लिओन एम. लेडर मैन (Leon M. Lederman) यांचा जन्मदिन.
1932 – मराठी भाषा व साहित्याचे समिक्षक आणि समाजचिंतक व लेखक नरहर अंबादास कुरुंदकर यांचा जन्मदिन.

15 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1291 – जर्मन शासक सम्राट रुडॉल्फ (पहिला) यांचे निधन.
1542 – विश्वातील सर्वात सुंदर चित्रकार लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन
1904 – रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचे निधन.
1919 – नोबल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मन एमिल लुई फिशर (Emil Fischer) यांचे निधन.
1967 – संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी गायक व रंगमंच अभिनेता बाल गंधर्व यांचे निधन.
1979 – मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावोदियाझ ओर्दाझ यांचे निधन.
2004 -पद्मभूषण पुरस्कार सन्मानित, कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक डॉ. बानू कोयाजी यांचे बानो जहांगीर कोयाजी यांचे निधन.

15 जुलै महत्वपूर्ण घटना

1662 – इंग्लंड मध्ये प्रसिद्ध असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना करण्यात आली.
1674 – मुघल सरदार बहादुरशाह कोकलताश याच्या ताब्यात असलेल्या पेडगावची सुमारे कोटीची लूट रायगडावर जमा झाली, मराठ्यांनी लूट केली.
1916 – जगभरात विमान, रोटरक्राफ्ट, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना आणि विक्री करणारी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बोईंग ची स्थापना करण्यात आली.
1926 – मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.
1927 – र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
1955 – देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
1955 – आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ जाहीरनाम्यावर 58 नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या.
1962 – ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.
1979 – भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
1996 – पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
1997 – पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
1997 – महाराष्ट्रीयन पर्यावरणवादी कार्यकर्ता महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
2006 – ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
2011 – भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने आपल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV द्वारे आधुनिक संप्रेषण उपग्रह GST-12 अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केला.
2013 – ट्विटरच्या माध्यमातून निधी गोळा करण्यासाठी समर्पित व्यासपीठ Givver डॉट कॉमने या दिवसाचे उद्घाटन केले, हा दिवस सोशल मीडिया गिव्हिंग डे म्हणुन साजरा केला जातो.
2014 मध्ये, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीनद्वारा, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण यांचे महत्त्व आणि स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित इतर कौशल्यांच्या विकासाविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो.
2020 – बिटकॉइन घोटाळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख राजकीय व्यक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची ट्विटर अकाउंट हॅक झाली.