06 ऑगस्ट दिन विशेष

06 ऑगस्ट दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

06 ऑगस्टला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1180 – जपानचे 82 वा सम्राट गो-तोबा यांचा जन्मदिन.
1809 – इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचा जन्मदिन
1881 – पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा पाश्चिम स्कॉटलंड येथील लॉकफील्डफार्म येथे जन्मदिन
1900 – टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनी चे सहसंस्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचा जन्मदिन
1925 – प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखिका, कवयित्री व प्रख्यात शास्त्रीय गायिका योगिनी जोगळेकर यांचा जन्मदिन.
1959 – रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सन्मानित “वॉटरमॅन ऑफ इंडिया” म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय जलसंधारण आणि पर्यावरणवादी तसचं ‘तरुण भारत संघ‘ चे संस्थापक राजेंद्र सिंह यांचा जन्मदिन.
1965 – भारतीय चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा जन्मदिन
1970 – श्री पुरस्कार सन्मानित भारतीय वंशीय अमेरिकन चित्रपट निर्माता आणि अभिनेता मनोज नेल्लियट्टू उर्फ एम. नाईट श्यामलन यांचा जन्मदिन.

06 ऑगस्टला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1925 – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.
1965 – प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट संगीत दिग्दर्शक व गीतकार वसंत पवार यांचे निधन.
1991 – ईराणचे 74 वे पंतप्रधान शापूर बख्तियार यांचे निधन.
1997 – साहित्य अकादमी पुरस्कार व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय आधुनिक आसामी साहित्याचे प्रणेते, लेखक व कादंबरीकार बीरेंद्र कुमार भट्टाचार्य यांचे निधन.
1999 – केन्द्रीय मंत्री, 3 वेळा राज्यसभा खासदार, 4 वेळा लोकसभा खासदार काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचे निधन.
2001 – भारतीय नौदल प्रमुख एडमिरल आधार कुमार चटर्जी यांचे निधन.
2019 – प्रसिद्ध भारतीय राजकारणी, वकील तसचं, भारतीय जनता पक्षाच्या सदस्या व माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन. इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला होत्या.

06 ऑगस्टच्या महत्वपूर्ण घटना

1914 – पहिल्या महायुद्धा दरम्यान ऑस्ट्रिया देशाने रुस देशाविरुद्ध युद्धाची घोषणा केली.
1914 – पहिल्या महायुद्धा दरम्यान सर्बियाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
1926 – जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.
1940 – सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.
1945 – दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला अमेरिकेने जपानच्या होरीशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला, इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला.
1960 – अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.
1962 – जमैका राष्ट्राला युनायटेड मिळाले.जमैकामध्ये ही तारीख स्वतंत्र दिवस म्हणून साजरी केली जाते.
1990 – इराकने कुवेत बळकवल्या प्रकरणी सुरक्षा परिषदेने इराकबरोबरच्या व्यापारावर जागतिक बंदी घातली.
1994 – डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला.