05 ऑगस्ट दिन विशेष

05 ऑगस्ट दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

05 ऑगस्टला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1850 – फ्रेंच लघुकथाकार व लेखक गाय दी मोपासां यांचा जन्मदिन.
1852 – ब्रिटीश कालीन भारतातील उडीसा राज्यातील राष्ट्रवादी स्वातंत्रता सेनानी आचार्य प्यारे मोहन यांचा जन्मदिन.
1858 – प्रसिद्ध महाराष्ट्रीयन इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन खरे यांचा जन्मदिन.
1890 – पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन इतिहासकार, लेखक आणि वक्ते तसचं, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू दत्तात्रय वामन पोतदार उर्फ दत्तो वामन पोतदार यांचा जन्मदिन.
1901 – भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी व मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री पं. द्वारका प्रसाद मिश्रा यांचा जन्मदिन.
1915 – पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, सन्मानित प्रख्यात हिंदी कवी व शिक्षणतज्ञ शिवमंगल सिंग ‘सुमन’ यांचा जन्मदिन.
1930 – अमेरिकन अंतराळवीर आणि वैमानिकी अभियंता तसचं, चंद्रावर पाय ठेवणारे पहिले व्यक्ती नील एल्डन आर्मस्ट्राँग यांचा जन्मदिन.
1947 – साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी वीरेन डंगवाल यांचा जन्मदिन.
1969 – माजी भारतीय क्रिकेटपटू बापू कृष्णराव व्यंकटेश प्रसाद यांचा जन्मदिन.
1975 – सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री काजोल यांचा जन्मदिन.
1987 – भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसोझा यांचा जन्मदिन.

05 ऑगस्टला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

882 – फ्रान्सचा राजा लुई (तिसरा) यांचे निधन.
1895 – जर्मन तत्त्ववेत्ता, इतिहासकार, साम्यवादी, सामाजिक शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार आणि व्यवसायिक फ्रेडरिक एंगेल्स यांचे निधन.
1950 – भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्वतंत्रता सेनानी व आसाम राज्याचे पहिले मुख्यमंत्री गोपीनाथ बोरदोलोई यांचे निधन.
1962 – अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्‍रो यांनी गोळी मारून आत्महत्या केली.
1984 – अभिनेता रिचर्ड बर्टन यांचे निधन.
1991 – होंडा कंपनी चे स्थापक सुइचिरो होंडा यांचे निधन.
1992 – भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि राजकीय नेते तसचं, भारतीय समाजवादी पक्षाचे संस्थापक अच्युत पटवर्धन यांचे निधन.
2000 – पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू व माजी कर्णधार लाला अमरनाथ यांचे निधन.
2014 – पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार प्राण कुमार शर्मा यांचे निधन.
2014 – भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन.

05 ऑगस्टच्या महत्वपूर्ण घटना

1861 – अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.
1914 – अमेरिकेत प्रथम ओहायो मध्ये इलेक्ट्रिक ट्रॅफिक लाईट सिस्टम स्थापित केले गेले.
1914 – प्रथम विश्वयुद्धात क्यूबा, उरुग्वे, मेक्सिको आणि अर्जेंटिना या देशांनी तटस्थ राहण्याची घोषणा केली.
1962 – देशांतील संपावर गेलेल्या कामगारांना चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी आणि पासपोर्टविना देश सोडून जाण्याच्या आरोपाखाली नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर 1990 मधे त्यांची सुटका झाली.
1962 – कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
1965 – सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली सुरुवात झाली.
1991 – दिल्ली येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी विराजमान होणाऱ्या न्यायमूर्ती लीला सेठ या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
1994 – इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
1997 – रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ-यू हे अंतराळयान मीर अंतराळस्थानकाकडे रवाना.
1997 – फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्‍या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे 2 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर.
2011 – अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या वैज्ञानिकांनी सायन्स मासिकेमध्ये मंगळ ग्रहावर प्राणी असल्याचा दावा केला.