02 ऑगस्ट दिन विशेष

02 ऑगस्ट दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

02 ऑगस्टला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1820 – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन टिंडाल यांचा जन्म.
1834 – स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड यांचा जन्म.
1835 – अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता वेस्टर्न इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची सह-संस्थापक इलिशा ग्रे यांचा जन्म.
1860 – प्रख्यात भारतीय बंगाली रसायनशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, उद्योगपती आणि परोपकारी तसचं, भारतातील रसायनशास्त्राचे जनक आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांचा जन्मदिन.
1861 – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म.
1876 – भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे निर्माता व रचनाकार, भारतीय स्वातंत्र्य सेनानी पिंगली वेंकैया यांचा जन्मदिन.
1877 – भारतीय वकील आणि राजकारणी रविशंकर शुक्ला यांचा जन्म.
1892 – वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचा जन्म.
1910 – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म.
1918 – आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा जे. पी. वासवानी यांचा जन्म.
1922 – पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती जी. पी. बिरला उर्फ गंगाप्रसाद बिरला यांचा जन्मदिन.
1929 – भारतीय राजकारणी विद्याचरणा शुक्ला यांचा जन्म.
1932 – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक लमेर हंट यांचा जन्म.
1941 – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ ज्यूल्स हॉफमन यांचा जन्म.
1945 – भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय यांचा जन्म.
1958 – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक अर्शद अयुब यांचा जन्म.

02 ऑगस्टला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1589 – फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचे निधन.
1781 – पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखारामबापू बोकील यांचे निधन.
1922 – दूरध्वनी यंत्राचे जनक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे निधन.
1934 – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष व माजी लष्कर प्रमुख पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचे निधन.
1978 – मोनॅको ग्रँड प्रिक्सचे संस्थापक अँटनी नोगेस(Anthony Noges) यांचे निधन.
1980 – पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय शिल्पकलेचे प्रणेते भारतीय शिल्पकार आणि चित्रकार रामकिंकर बैज यांचे निधन.
2010 – भारतीय हिंदी, पंजाबी आणि गुजराती भाषिक चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते व चित्रपट निर्माता कमल कपूर यांचे निधन.

02 ऑगस्टच्या महत्वपूर्ण घटना

1677 – छत्रपती शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले असतांना त्यांनी तिथे डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
1790 – अमेरिकेत पहिली जनगणना करण्यात आली.
1858 – ब्रिटीश सरकारने गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट पारित केला.
1870 – जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवे ची लंडन मध्ये सुरवात झाली.
1923 – काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष बनले.
1954 – दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
1979 – नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्‍नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
1990 – इराकने कुवेतवर आक्रमण केले, त्यामुळे गुल्फ युद्ध सुरु झाले.
1996 – अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.