01 जानेवारी दिनविशेष

01 जानेवारी दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

01 जानेवारीला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1662 – सहावा पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म.
1892 – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म
1894 – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म
1900 – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचा जन्म.
1902 – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म.
1918 – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म
1928 – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म.
1935 – भारतीय अभिनेत्री शकीला यांचा जन्म.
1941 – भारतीय चित्रपटांमध्ये हास्य कलाकार म्हणून काम करणारे गोवर्धन असराणी यांचा जन्म.
1943 – पदमश्री, पदमभूषण विजेते शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.
1950 – प्रसिद्ध उर्दू कवी राहत इंदोरी यांचा जन्म.
1950 – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका दीपा मेहता यांचा जन्म.
1951 – भारतीय चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म.

 

01 जानेवारीला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1515 – फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचे निधन.
1748 – स्विस गणितज्ञ जोहान बर्नोली यांचे निधन.
1894 – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचे निधन
1944 – दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन.
1955 – भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.
1975 – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन.
1983 – भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी.एन.खुरोदे यांचे निधन.
2008 – भारताचे प्रसिद्ध लेखक प्रतापचंद्र चंदर यांचे निधन.

 

01 जानेवारीच्या महत्वपूर्ण घटना

1664 – छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत अभियानाला सुरुवात केली.
1756 – निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
1785 – डेली यूनिवर्सल रजिस्टर म्हणजेच टाईम्स ऑफ लंडन ने आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित केला होता.
1808 – अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
1818 – भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.
1842 – बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.
1848 – महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
1862 – भारतीय दंड संहिता (इंडियन पिनल कोड) लागू झाली.
1880 – भारतामध्ये मनी ऑर्डर ची सेवा सुरु झाली.
1880 – विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.
1883 – पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.
1899 – क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
1900 – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
1908 – संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.
1912 – दिवशी रिपब्लिक ऑफ चायना ची स्थापना झाली होती.
1915 – महात्मा गांधी यांना केसर ये हिंद चा पुरस्कार व्हायसरॉय यांच्या हातून मिळाला.
1923 – चित्तरंजन दास आणि जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली.
1932 – डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले.
1972 – वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडल्या गेले.
1973 – मानेकशॉ यांना फ़ील्ड मार्शल नियुक्त केल्या गेले.
1995 – जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली.
2000 – ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
2001 – कलकत्ता ला अधिकृत रित्या कोलकत्ता म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
2004 – चेकोस्लोवाकिया चे राष्ट्रपती व्हॅकलाव हवेली यांना गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.