14 जुलै दिन विशेष

14 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

गोपाल गणेश आगरकर – देशाचे थोर समाजसुधारक व तत्वज्ञानी विचारवंत त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या केसरी या मराठी वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरक यांचा जन्मदिन.
_____________________________________________

14 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1856 – थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म.
1862 – ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट यांचा जन्म.
1884 – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म.
1901 – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी आणि पत्रकार रती राम देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन.
1910 – टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म.
1920 – प्रसिद्ध भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्मदिन.
1967 – श्रीलंका देशाचे माजी क्रिकेटपटू आणि माजी कसोटी कर्णधार व राजकारणी हसन तिलकरत्ने यांचा जन्मदिन.

14 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1904 – दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी पॉल क्रुगर यांचे निधन
1936 – न्यूबेरी पदक विजेता अमेरिकेतील पहिले यशस्वी भारतीय अक्षरवीर धन गोपाल मुखर्जी यांचे निधन.
1963 – योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन.
1971 – भारतातील अग्रगण्य अष्टपैलू खेळाडू ज्यांनी केवळ क्रिकेट आणि टेनिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले सय्यद मोहम्मद हाडी यांचे निधन.
1976 – सत्तरच्या दशकातील भारतीय चित्रपट सृष्टीतील अतुलनीय भारतीय संगीत दिग्दर्शक मदन मोहन कोहली यांचे निधन.
1998 – मॅकडॉनल्ड चे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचे निधन
2003 – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंह उर्फ रुजू भैय्या यांचे निधन.
2008 – साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी (१६वे) सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन.

14 जुलै महत्वपूर्ण घटना

1789 – पॅरिस मधील नागरिकांनी फ्रेंच शासकांकडून होत असलेल्या अन्याया विरुद्ध फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे प्रतिक असलेल्या बॅलेस्टाईलच्या तुरुंगावर हल्ला केला. या घटनेपासून फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली.
1867 – आल्फ्रेड नोबेल(Alfred Nobel) यांनी डायनामाईट या स्फोटकाची यशस्वी चाचणी घेतली.
1958 – इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
1960 – चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात आल्या 45 वर्षे त्यांनी संशोधन केले.
1969 – अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
1976 – कॅनडा देशांत मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
1979 – अमेरिकेने अणुचाचणी केली.
2003 – जागतिक बुद्धिबळ महासंघा द्वारे भारतीय बुद्धिबळ खेळाडू संदीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार देण्यात आला.
2013 – साली 160 वर्षांपासून सुरु असलेली डाकतार विभागाची सेवा बंद करण्यात आली.