16 जुलै दिन विशेष

16 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

जागतिक सर्प दिवस – या दिवसाचे उद्दीष्ट म्हणजे विविध प्रकारच्या सर्पांविषयी जागरूकता निर्माण करणे. मानवी नजरेत, सापांची नकारात्मक भूमिका दूर करणे आणि वातावरणास संतुलित ठेवण्यात सापांच महत्त्व पटवून सांगणे.
_____________________________________________

16 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1773 – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचा जन्म.
1909 – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली यांचा जन्म.
1913 – दक्षिण भारतातील ज्योतिर मठाचे मठाधीश व स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्मदिन.
1914 – प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक वामनराव कृष्णाजी उर्फ वा. कृ. चोरघडे यांचा जन्मदिन.
1917 – प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथुर यांचा जन्मदिन.
1923 – भूदल प्रमुख के. व्ही. कृष्णराव यांचा जन्म.
1926 – नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इर्विन रोझ यांचा जन्म.
1968 – पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी सर्वोत्कृष्ट भारतीय हॉकीपटू व कर्णधार धनराज पिल्ले यांचा जन्मदिन.
1968 – विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर यांचा जन्म.
1983 – हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्म.

16 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1342 – हंगेरीचा राजा चार्ल्स (पहिला) यांचे निधन.
1882 – अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरीटॉड लिंकन यांचे निधन.
1993 – संगीत नाटक अकादमी पुरस्कार व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रामपूर-सहास्वन घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद निसार हुसैन खान यांचे निधन.
1994 – नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे निधन.
2005 – रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेता प्रसिद्ध भारतीय कन्नड भाषिक नाटककार आणि निनासम धर्म संस्था संस्थेचे संस्थापक के. वी. सुबन्ना यांचे निधन.
2009 – पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय कर्नाटिक संगीतकार व तमिळ चित्रपट पार्श्वगायिका दमल कृष्णस्वामी पट्टममल यांचे निधन.
2013 – प्रसिद्ध भारतीय इतिहासकार व प्राध्यापक तसचं, सोशल सेंटर फॉर स्टडीज इन सोशलचे संस्थापक-संचालक बरुण डी यांचे निधन.
2020 – महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांचे निधन.

16 जुलै महत्वपूर्ण घटना

इस. पूर्व 622 – मुस्लीम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांनी मके वरून मादिनाला प्रयाण केलं. याइस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.
1661 – स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.
1935 – ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले.
1945 – अमेरिकेने आपल्या पहिल्या अणुबॉम्ब ची चाचणी केली.
1951 – ब्रिटन देशाने नेपाल देशाला स्वतंत्र घोषित केलं.
1965 – ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.
1969 – चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो – 11 अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.
1981 – भारताने अणुबॉम्ब ची चाचणी केली.
1992 – भारताचे 9 वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली.
1998 – गुजरात राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांनी शाळेत प्रवेश घेण्याच्या वेळी पाल्याच्या नावानंतर वडिलांच्या नावाप्रमाणे आईचे नाव सुद्धा लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
2006 – संयुक्त राष्ट्र परिषदेने कोरिया राष्ट्रावर बंदी घालण्याच्या ठरावास मंजूरी दिली.
2007 – बांगलादेशाच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना वाजीद यांना भ्रष्ट्राचार प्रकरणी कैद करण्यात आलं.