13 जुलै दिन विशेष

13 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

                बाजी प्रभु देशपांडे स्मृतीदिन – बाजी प्रभु देशपांडे आणि आदिलशाह सल्तनतचे सेनापती सिद्दी मसूद यांच्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर शहरालगत असलेल्या विशालगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराच्या कडेला पावनखिंडची लढाई झाली, पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.
_____________________________________________

13 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1863 – साली अँग्लो-इंडियन इजिप्ततज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि लोककलाकार तसचं, युनायटेड किंगडममधील पुरातत्व शाखेच्या प्राध्यापक मार्गारेट अलीस मुरे यांचा जन्मदिन.
1892 – साली भारताच्या राजस्थान राज्यातील जयपूर-अतरौली घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्मदिन.
1930 – माजी भारतीय क्रिकेटपटू व माजी भारतीय कसोटी क्रिकेट पंच स्वरूप किशन यांचा जन्मदिन.
1942 – प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट अभिनेता व पर्यावरणवादी कार्यकर्ता हॅरिसन फोर्ड(Harrison Ford) यांचा जन्मदिन.
1944 – रुबिक क्यूब चे निर्माते एर्नो रुबिक यांचा जन्म
1953 – साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित भारतीय तमिळ भाषिक कवी, गीतकार आणि कादंबरीकार वैरामुथू रामासामी यांचा जन्मदिन.
1953 – वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स यांचा जन्म.
1964 – माजी भारतीय क्रिकेटपटू उत्पल चटर्जी यांचा जन्मदिन.

13 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1660 – पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.
1969 – बंगाली शिक्षणतज्ञ, लेखक, तत्वज्ञानी आणि पूर्व पाकिस्तानचे भाषाशास्त्रज्ञ मुहम्मद शाहिदुल्ला यांचे निधन.
1980 – बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचे निधन.
1793 – फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात यांचे निधन.
1994 – साली भारतीय शास्त्रीय गायक आणि शिक्षक कृष्णा गुंडोपंत गिंडे यांचे निधन.
1995 – ज्ञानपीठ पुरस्कार विजेता भारतीय बंगाली भाषिक कादंबरीकार आणि कवी आशापूर्ण देवी यांचे निधन.
1995 – भारतीय पत्रकार आणि स्तंभलेखक तसचं, सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट मसिक लेखिका देवयानी चौबाल यांचे निधन.
2009 – संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित मराठी चित्रपट अभिनेते निळूभाऊ फुले यांचे निधन

13 जुलै महत्वपूर्ण घटना

1960 – पावनखिंडीतील लढाई – बाजी प्रभु देशपांडे आणि आदिलशाह सल्तनतचे सेनापती सिद्दी मसूद यांच्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर शहरालगत असलेल्या विशालगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराच्या कडेला पावनखिंडची लढाई झाली.
1803 – राजा राम मोहन राय आणि अलेक्झांडर डफ यांनी आपल्या पाच विद्यार्ध्यांसोबत स्कॉटिश चर्च महाविद्यालयाची स्थापना केली.
1837 – राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली, तेव्हापासून ते इंग्लंडच्या राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.
1905 – कलकत्ता येथील साप्ताहिक वर्तमानपत्र ‘संजीवनी’ मध्ये पहिल्यांदा विदेशी मालाचा बहिष्कार करा म्हणून प्रकाशित करण्यात आलं.
1908 – ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
1929 – लाहोर येथिल तुरुंगात कैदेत असतांना क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांनी उपोषण करण्यास सुरवात केली, त्यात त्यांचा मृत्यु झाला.
1955 – 28 वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली गेली, ही फाशी ग्रेट ब्रिटनमधली स्त्री कैद्याची अखेरची फाशी ठरली.
1983 – श्रीलंकेत वांशिक हत्याकांड – 3000 तामिळ व्यक्तींची हत्या. 400000 हून अधिक तामिळींचे पलायन केले.
2006 – ईराण देशांतील अणुबॉम्ब निर्माण प्रकरण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे देण्यात आले.
2011 – महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरात बॉम्बस्फोट झाले त्यात 26 जण ठार, तर 130 जण जखमी झाले.