CET परिक्षा 3 ऑक्‍टोबरपासून सुरुवात होणार, सुधारित वेळापत्रक जाहीर.

0

CET परिक्षा 3 ऑक्‍टोबरपासून सुरुवात होणार, सुधारित वेळापत्रक जाहीर…

Revised Schedule of Technical Education & Higher Education CET 2020

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET CELL) तंत्रशिक्षण आणि उच्चशिक्षण विभागाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या CET परीक्षांचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी प्रसिद्ध केले. त्यानुसार CET परीक्षांना येत्या 3 ऑक्‍टोबरपासून सुरुवात होणार आहे.

राज्य CET सेलने प्रसिद्ध केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षण विभागाच्या चार CET परीक्षा, तर उच्च शिक्षण विभागाच्या आठ सीईटी परीक्षा येत्या ऑक्‍टोबर महिन्यात होणार आहेत. त्या सुरक्षित नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्राची माहिती, रिपोर्टिंग टाइम, परीक्षा सुरू होण्याची वेळ, परीक्षा केंद्रावरील सुरक्षित नियमांची माहिती प्रवेश पत्रावर देण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही, असेही CET सेलने स्पष्ट केले.

दरम्यान, तीन वर्षीय एलएलबी आणि बीएड या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, या प्रवेश परीक्षांबाबत अधिक माहिती राज्य CET सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उच्चशिक्षण विभाग CET परीक्षा अभ्यासक्रम व सीईटी परीक्षा दिनांक 

 1. M. P. Ed – 3 ऑक्‍टोबर (फिल्ड टेस्ट – 4 ते 7 ऑक्‍टोबर 2020)
 2. M. Ed – 3 ऑक्‍टोबर
 3. B. Ed / M. Ed CET – 10 ऑक्‍टोबर
 4. LLB (पाच वर्षे) – 11 ऑक्‍टोबर
 5. B.P. Ed – 11 ऑक्‍टोबर
 6. BA / B. Sc B. Ed इंटिग्रेटेड – 11 ऑक्‍टोबर
 7. B. Ed & B. Ed (ELCT) – काही दिवसांत जाहीर करण्यात येईल.
 8. LLB (3 वर्षे) – काही दिवसांत जाहीर करण्यात येईल

 

तंत्रशिक्षण विभाग CET अभ्यासक्रम व सीईटी परीक्षा दिनांक :-

 1. M. Arch CET – 3 ऑक्‍टोबर
 2. M-HMCT – 3 ऑक्‍टोबर
 3. MCA – 10 ऑक्‍टोबर
 4. B-HMCT – 10 ऑक्‍टोबर

1) उच्चशिक्षण विभागाच्या CET परीक्षा वेळापत्रक :- पहा

2) तंत्रशिक्षण विभाग CET परीक्षा वेळापत्रक :- पहा

3) CET सेल संकेतस्थळ :- पहा

4) MAH AAC CET 2020 परिक्षा वेळापत्रक :- पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here