31 जुलै दिन विशेष

31 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

31 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1704 – स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर यांचा जन्म.
1800 – जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचा जन्मदिन.
1886 – अमेरिकन अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बे यांचा जन्म.
1872 – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मणरामचंद्र पांगारकर यांचा जन्म.
1880 – प्रसिद्ध भारतीय आधुनिक साहित्यिक, लेखक व कादंबरीकार धनपत राय श्रीवास्तव उर्फ मुंशी प्रेमचंद यांचा जन्मदिन.
1902 – भारतातील सर्वोच्च पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार के. शंकर पिल्लई यांचा जन्मदिन.
1907 – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म.
1912 – नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमॅन यांचा जन्मदिन.
1918 – भारतीय संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर उर्फ दादासाहेब वर्णेकर यांचा जन्मदिन.
1947 – सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्मदिन.
1965 – सुप्रसिद्ध ब्रिटीश चित्रपट निर्माता, हॅरी पॉटर च्या लेखिका व पटकथा लेखक जे. के. रोलिंग यांचा जन्मदिन.

31 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1750 – पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचे निधन.
1805 – भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई यांचे निधन.
1865 – आधुनिक मुंबईचे शिल्पकार, भारतीय दानशूर व शिक्षणतज्ञ जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन.
1875 – अमेरिकेचे माजी 17 वे अध्यक्ष अँड्र्यू जॉनसन यांचे निधन.
1912 – ब्रिटीश कालीन भारतातील इम्पीरियल सिव्हिल सर्व्हिसचे सदस्य राजकीय सुधारक, पक्षीशास्त्रज्ञ व वनस्पतीशास्त्रज्ञ, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक एलन ऑक्टाव्हियन ह्यूम यांचे निधन.
1940 – ब्रिटीश गव्हर्नर मायकेल ओड्वायर यांची लंडन येथे गोळी मारून हत्या करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी उधमसिंग यांचे निधन.
1980 – पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे निधन.
1968 – चित्रकार, संस्कृत पंडित पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे निधन.
2014 – भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचे निधन.

31 जुलै महत्वपूर्ण घटना

1498 – पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.
1657 – मुघलांनी मराठा साम्राज्यातील विजापूर येथील कल्याणी किल्ला जिंकला.
1658 – औरंगजेब मुघल सम्राट बनला.
1856 – न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना.
1933 – महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रम सोडला.
1937 – के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.
1948 – भारतात कलकत्ता शहरात प्रथम राज्य सेवा परिवहनाची स्थापना करण्यात आली.
1954 – इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.
1956 – कसोटी सामन्यातील एका डावात सर्व 10 गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.
1964 – रेंजर – 07 अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.
1982 – सोवियत संघाने आण्विक चाचणी केली.
1992 – जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
1992 – भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसे पुरस्काराने गौरविण्यात आलं.
2000 – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.
2001 – महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहूमहाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2006 – फिदेल कॅस्ट्रो यांनी आपल्या भावाला, राऊल यांच्याकडे सत्ता हस्तगत केली.
2012 – मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.