30 जुलै दिनविशेष

30 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

30 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1818 – इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचा जन्म.
1855 – जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा जन्म.
1863 – अमेरिकन फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक व उद्योगपती हेनरी फोर्ड यांचा जन्मदिन.
1886 – पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महिला चिकित्सक व समाजसुधारक मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जन्मदिन.
1923 – पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार, संस्कृतज्ञ व सौंदर्यशास्त्री गोविंदचंद्र पांडे यांचा जन्मदिन.
1928 – पद्मश्री पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्मदिन.
1945 – सेवानिवृत्त भारतीय नागरी सेवक व भारताचे माजी 16 वे मुख्य निवडणूक आयुक्त आणि लेखक नवीन चावला यांचा जन्मदिन.
1947 – ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे 38 वे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म.
1951 – भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.
1973 – सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायक व संगीतकार सोनू निगम यांचा जन्मदिन.

30 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1622 – संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.
1718 – पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन.
1771 – अठराव्या शतकातील प्रसिद्ध इंग्रजी कवी, पत्र-लेखक व शास्त्रीय अभ्यासक थॉमस ग्रे यांचे निधन.
1898 – जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क यांचे निधन.
1930 – बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन.
1947 – ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन.
1960 – कर्नाटकसिंह म्हणून प्रसिद्ध असणारे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व महात्मा गांधी यांचे सहकारी गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन.
1983 – भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व नाट्य संगीताचे गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन.
1994 – प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कादंबरीकार व साहित्यिक तसचं, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ‘बालभारती’चे संपादक शंकर पाटील यांचे निधन.
1995 – अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचे निधन.
1997 – व्हिएतनामचा राजा बाओडाई यांचे निधन.
2007 – स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचे निधन.
2007 – इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो अँतोनियोनी यांचे निधन.
2011 – संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भरतीय संगीतकार, गायक व मानववंशशास्त्रज्ञ अशोक दामोदर रानडे यांचे निधन.
2013 – भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन.

30 जुलै महत्वपूर्ण घटना

762 – खलिफा अल मन्सूर यांनी बगदाद शहराची स्थापना केली.
1836 – अमेरिकेतील हवाई या शहरात पहिला इंग्रजी भाषिक वृत्तपत्र प्रकाशित झाले.
1898 – विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
1909 – अमेरिकन वैमानिक व शास्त्रज्ञ राईट बंधू यांनी सैन्यांसाठी पहिले विमान तयार केले.
1930 – आयोजित पहिला फुटबॉल विश्वकप उरुग्वेच्या फुटबॉल संघाने अर्जेटिना संघाचा 4-2अश्या फरकाने पराभव करून जिंकला.
1962 – ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे 8030 किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
1966 – इंग्लंड च्या फुटबॉल संघाने पहिल्यांदा विश्वकप जिंकला.
1971 – अपोलो-15 यान चंद्रावर उतरले.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार जाहीर.
2000 – भारतीय अभिनेते डॉ. राजकुमार यांचे चंदन तस्कर वीरप्पन यांनी अपहरण केलं.
2000 – कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल.
2001 – जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
2012 – दिल्लीतील पावर ग्रिड खराब झाल्यामुळे उत्तर भारतील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.
2014 – पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून 50 ठार.