27 जुलै दिन विशेष

27 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम – 2015 साली भारतीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्न, तसचं, पद्मभूषण व पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित भारताचे 11 वे राष्ट्रपती “मिसाईल मॅन” म्हणून प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक व माजी भारतीय राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन.
_____________________________________________

 

27 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1667 – स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म.
1724 – राजस्थान मधील मेवाड प्रांताचे शासक महाराणा प्रतापसिंह द्वितीय यांचा जन्मदिन.
1858 – राधा स्वामी सत्संग ब्यास येथील दुसरे गुरु सावनसिंग जी महाराज यांचा जन्मदिन.
1899 – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.
1911 – पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्मदिन.
1913 – भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यकर्त्या कल्पना दत्त यांचा जन्मदिन.
1940 – भारतीय वंशीय अमेरिकन लेखिका व कादंबरीकार भारती मुखर्जी यांचा जन्मदिन.
1950 – ग्रामी पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वीणा वादक व्ही. एम. भट्ट यांचा जन्मदिन.
1955 – माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक ॲलन बॉर्डर(Allan Border) यांचा जन्मदिन.
1967 – भारतीय चित्रपट अभिनेते असिफ बसरा यांचा जन्म.
1969 – दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू व मुंबई इंडियन संघाचे प्रशिक्षक जोंटी रोड्स यांचा जन्मदिन.
1990 – भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री कृती सॅनॉन यांचा जन्मदिन.

27 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1844 -अणूंच्या सिद्धांताचे परिचय देणारे महान ब्रिटीश रसायन, भौतिक व भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन.
1935 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
1975 – गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.
1980 – इराण देशाचे शेवटचे शासक व शाह ऑफ इराण म्हणून प्रसिद्ध मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन.
1992 – खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक अमजद खान यांचे निधन.
1895 -किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.
1997 – हिंदुत्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.
2002 – भारताचे अकरावे उपराष्ट्रपती व आंध्र प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल कृष्णकांत यांचे निधन.
2007 – पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय अणु रसायनशास्त्रज्ञ, संरक्षण शास्त्रज्ञ आणि स्फोटक अभियांत्रिकी शास्त्रातील तज्ञ तसचं, भारतीय विस्फोटक संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे संस्थापक संचालकवामन दत्तात्रेय पटवर्धन यांचे निधन.
2015 – भारतीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्न, तसचं, पद्मभूषण व पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित भारताचे 11 वे राष्ट्रपती “मिसाईल मॅन” म्हणून प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक व माजी भारतीय राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन.

27 जुलै महत्वपूर्ण घटना

1761 -माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील 4थे पेशवे बनले.
1866 – आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण तसेच युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.
1897 – बाळ गंगाधर टिळक यांना पहिल्यांदा कैद करण्यात आलं.
1987 – पुरातत्व विभागाच्या संशोधकांना टायटॅनिक जहाजाचा मलबा सापडला.
1890 – डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.
1921 – टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.
1940 – अ‍ॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.
1949 – पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.
1955 – दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.
1997 – तामिळनाडुचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि द्रमुकचे माजी अध्यक्ष एम. करुणानिधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आले.
1999 – द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.
2001 – सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
2012 – लंडन देशांत 30 व्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली.