25 जुलै दिन विशेष

25 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

25 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1109 – पोर्तुगालचा राजा अफोन्सो पहिला यांचा जन्म.
1875 – ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म.
1894 – प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि संस्कृत भाषेचे समिक्षक व शोधकर्मी परशुराम चतुर्वेदी यांचा जन्मदिन.
1919 – गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म.
1922 – प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी विश्वनाथ वामन बापट यांचा जन्मदिन.
1929 – प्रख्यात भारतीय राजकारणी व माजी लोकसभा अध्यक्ष तसचं, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य सोमनाथ चटर्जी यांचा जन्मदिन.
1936 – पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय वैज्ञानिक व उद्योगपती तसचं, औषध निर्माण कंपनी सिप्लाचे (CIPLA) अध्यक्ष युसुफ ख्वाजा हमीद यांचा जन्मदिन.
1978 – जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म.

25 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

306 – रोमन सम्राट कॉन्स्टान्शियस क्लोरस यांचे निधन.
1409 – सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन.
1880 – समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन.
1973 – कॅनडाचे 12वे पंतप्रधान लुईस स्टिफन सेंट लोरें यांचे निधन.
1977 – पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक व लष्करी शिक्षणाचे प्रसारक कॅप्टन शिवरामपंत दामले यांचे निधन.
1995 – ब्रिटीश कल्पित बालकथा लेखक व पत्रकार जेनिस इलियट यांचे निधन.
2012 – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचे निधन.
2007 – माजी जर्मन फुटबॉल खेळाडू बेर्न्ड जाकूबोव्हस्की यांचे निधन.
2015 – भारतीय वकील आणि राजकारणी आर. एस गवई यांचे निधन.

25 जुलै महत्वपूर्ण घटना

1648 – आदिलशहाच्या आज्ञेवरुन मुस्तफाखान याने जिंजीनजीक शहाजीराजे यांना कैद केले.
1689 – फ्रांस देशाने इंग्लंड देशाविरुद्ध युद्धाची घोषणा केली.
1813 – भारतात सर्वप्रथम नौका दौड प्रतियोगिता सुरु करण्यात आली.
1837 – इलेक्ट्रिक टेलीग्राफच्या वापराचे प्रथम यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात आलं.
1917 – कॅनडा देशांत आयकर लागू करण्यात आला.
1992 – एस. डी शर्मा हे भारताचे नव्या क्रमांकाचे राष्ट्रपती बनले.
1997 – इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कार जवाहरलाल नेहरूपुरस्काराने गौरविण्यात आलं.
1894 – पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
1908 – किकूने इकेदा यांनी मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला.
1909 – लुई ब्लेरियो यांनी प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
1917 – कॅनडात आयकर लागू झाला.
1943 – दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.
1973 – सोव्हिएत संघाचे मार्स हे अंतराळयान प्रक्षेपित.
1978 – जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
1984 – सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली.
1994 – इस्त्राएल व जॉर्डनमधे 1948 पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त
1997 – भारताच्या राष्ट्रपती पदी विराजमान होणारे के. आर. नारायण हे भारतातील दहावे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती ठरले.
1997 – इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना नेहरू पुरस्कार जाहीर.
1999 – अमेरिकन माजी व्यावसायिक रोड रेसिंग सायकलपटू लान्स लान्स आर्मस्ट्राँग यांनी आपली पहिली टूर डी फ्रांस सायकल शर्यत जिंकली.
2007 – भारताच्या तात्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची आपल्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.