23 जुलै दिन विशेष

23 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – जलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म.
_____________________________________________

 

23 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1856 – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म.
1885 – अमेरिकेचे अठरावे राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रॅंट यांचा जन्मदिन.
1886 – इलेक्ट्रॉन आणि आयन उत्सर्जन घटनेचा सिद्धांत विकसित करणारे महान जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर हंस शॉटकी यांचा जन्मदिन.
1898 – ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध बंगाली भाषिक कादंबरीकार व लेखक ताराशंकर बंद्योपाध्याय यांचा जन्मदिन.
1899 – पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान यांचा जन्म.
1906 – भारतीय क्रांतिकारक हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिन.
1917 – महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत भिडे उर्फ ताई भिडे यांचा जन्मदिन.
1925 – बांगलादेश चे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचा जन्म.
1937 – राजस्थान राज्यातील जयपुर च्या अत्रोली घराण्यातील गायिका धोंडूताई कुलकर्णी यांचा जन्मदिन.
1973 – भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.
1975 – तमिळ अभिनेता सूर्य शिवकुमार यांचा जन्म.
1976 – हंगेरीची बुद्धीबळपटू ज्यूडीथ पोल्गार यांचा जन्म.

23 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1885 – अमेरिकेचे माजी अठरावे राष्ट्राध्यक्ष युलीसेस सिंपसन ग्रांट यांचे निधन.
1993 – छत्तीसगड राज्यातील भारतीय स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मण प्रसाद दुबे यांचे निधन.
1997 – शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन.
1999 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी व आंबेडकर चळवळीचे नेता दामोदर तात्याबा उर्फ दादासाहेब रुपवते यांचे अकोले, अहमदनगर येथे निधन.
2004 – प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता महमूद यांचे निधन.
2012 – भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकार, भारतीय राष्ट्रीय लष्करा अधिकारी आणि आझाद हिंद सरकारमधील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन.
2016 – पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, कालिदास सन्मान पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार S.H. रजा यांचा यांचे निधन.

23 जुलै महत्वपूर्ण घटना

1840 – कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.
1927 – मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले, या केंद्रावरून दररोज प्रसारण करण्यास सुरुवात करण्यात आली.
1903 – साली फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली गाडी विकली.
1929 – इटलीमधील फॅसिस्ट सरकारने परदेशी शब्द वापरण्यास बंदी घातली.
1942 – ज्यूंचेशिरकाण, ब्लिंका छळछावणी उघडण्यात आली.
1982 – ‘आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशन’ ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर 1985-86 पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
1983 – LTTE ने श्रीलंकेच्या 13 सैनिकांची हत्या केली.
1983 – माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट 143 या बोईंग 767-233 विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.
1986 – जैव‍अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ‘हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.
1999 – केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
2001 – इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदी मेघावती सुकर्णोपुत्री यांची नियुक्ती करण्यत आली.