22 जुलै दिन विशेष

22 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

लोकमान्य टिळक – जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना 06 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.
_____________________________________________

 

23 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1778 – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्तावलुडविग हर्ट्झ यांचा जन्म.
1898 – शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म.
1915 – भारतीय-पाकिस्तानी राजकारणी आणि राजनयिक शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला यांचा जन्म.
1923 – हिंदी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंदमाथूर तथा मुकेश यांचा जन्म.
1925 – पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म.
1937 – मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचा जन्म.
1970 – महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म.
1992 – अमेरिकन गायक व अभिनेत्री सेलेना गोमेझ यांचा जन्म.

22 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1540 – जॉन झापोल्या, हंगेरीचा राजा यांचा मृत्यू.
1826 – ज्युसेप्पे पियाझी, इटालियन खगोलशास्त्रज्ञ, यांचा मृत्यू
1918 – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदरलाल रॉय यांचा मृत्यू
1984 – साहित्यिक आणि प्रकाशक गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ यांचा मृत्यू

22 जुलै महत्वपूर्ण घटना

1793 – अलेक्झांडर मॅकेंझी मेक्सिको पार करून पॅसिफिक तटावर पोचणारा पहिला युरोपीय झाला.
1812 – आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टनने सालामांका, स्पेन येथे फ्रेंच सैन्याला हरवले.
1908 – जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना 06 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.
1931 – फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला.
1933 – विली पोस्ट या वैमानिकाने 07 दिवस 18 तास 49 मिनिटे या विक्रमी वेळेत विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
1941 – वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.
1941 – दुसरे महायुद्ध – अमेरिकेत पेट्रोलचे रेशनिंग सुरू करावे लागले.
1944 – पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.
1946 – इर्गुनया दहशतवादी संघटनेने जेरुसलेम मधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्ब हल्ला केला. त्यात ९० ठार.
1977 – चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.
1993 – वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले.
2001 – जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू इयान थॉर्प याने 400 मीटर फ्रीस्टाइल शर्यत 3 मि. 40.17 सेकंदांत जिंकली.
1947 – भारताने राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.