16 नोव्हेंबर दिनविशेष

16 नोव्हेंबर दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

  • 16 नोव्हेंबरला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

ई.पु.42 – रोमन सम्राट तिबेरीयस यांचा जन्म
1836 – हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचा जन्म.
1894 – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म.
1897 – भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म.
1904 – नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझीकीवे यांचा जन्म.
1909 – भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म.
1917 – संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचा जन्म.
1927 – मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म.
1930 – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म.
1963 – अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म.
1973 – बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म.

  • 16 नोव्हेंबरला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1857 – पासी जातीची वीरांगना उदा देवी यांचा मृत्यू झाला.
1915 – गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह 7 जणांना फाशी देण्यात आले.
1947 – व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचे निधन.
1960 – अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचे निधन.
1967 – संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचे निधन.
2006 – नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे निधन.
2015 – प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन.
1915 – भारतीय क्रांतिकारी कर्तारसिंह सराभा यांचे निधन झाले.

  • 16 नोव्हेंबरच्या महत्वपूर्ण घटना

1807 – ओकलाहोमा हे अमेरिकेचे 46 वे प्रांत बनले होते.
1821 – मेक्सिको या देशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली होती.
1868 – लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. (ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले.)
1893 – डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.
1914 – अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.
1915 – लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह 7 जणांना फाशी देण्यात आली.
1930 – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्‍नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
1945 – युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
1965 – वाल्ट डिस्नी वर्ल्ड ची पहिल्यांदा सार्वजनिक रित्या घोषणा करण्यात आली होती.
1975 – पापुआ न्यू गिनी या देशाने ऑस्ट्रेलिया या देशापासून स्वातंत्र्य मिळविले होते.
1988 – अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
1995 – भारतीय वंशाचे वासुदेव पांडे त्रिनिनाद हे टोबैगो या देशाचे पंतप्रधान बनले.
1996 – कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.
1996 – चतुरंग प्रतिष्ठान च्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड.
1997 – अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
2006 – पाकिस्तान ने मध्यम अंतराच्या गोरी-V क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले होते.
2014 – इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेने सिरीया येथील कुर्दिश योद्ध्यांच्या विरुध्द युद्धास सुरुवात केली होती.
2007 – भीषण चक्रीवादळ ‘सीडर’ ने बंगालच्या खाडीतून उगम पावून बांगलादेशात भीषण अतोनात नुकसान केले.
2013 – 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. सचिनला हा सन्मान सर्वात लहान वयात म्हणजे वयाच्या 40शीत मिळाला.