12 जुलै दिन विशेष

12 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

मलाला  युसुफजई  जन्मदिन – युवा नोबल पारितोषिक विजेता पाकिस्तानी स्त्रीवादी शैक्षणिक कार्यकर्त्या महिला मलाला यूसुफजई यांचा जन्म (पाकिस्तान).
_____________________________________________

12 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1864 – अमेरिकेतील प्रसिद्ध पहिले कृष्णवर्णीय कृषी वैज्ञानिक, संशोधक तसचं, शिक्षणतज्ञ आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंगटन कार्वर यांचा जन्मदिन.
1920 – भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी (16वे) सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचा जन्मदिन.
1965 – माजी यष्टिरक्षक क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्मदिन.
1982 – अर्जुन पुरस्कार विजेता महिला टेबल टेनिसपटू अचंत शरत कमल यांचा जन्मदिन.
1997 – युवा नोबल पारितोषिक विजेता पाकिस्तानी स्त्रीवादी शैक्षणिक कार्यकर्त्या महिला मलाला यूसुफजई यांचा जन्म (पाकिस्तान).

12 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1489 – दिल्ली येथील लोदी वंशाचे संस्थापक व शासक बहलूल खान लोदी यांचे निधन.
1999 – भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध ‘जुबली स्टार’ आणि ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून आपली ओळख निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते राजेंद्र कुमार यांचे निधन.
2013 – सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते प्राण कृष्ण सिंकद उर्फ प्राण यांचे निधन.

12 जुलै महत्वपूर्ण घटना

1290 – इंग्लंडचा राजा एडवर्ड प्रथम च्या आदेशानुसार यहुद्यांना हाकलून देण्यात आले.
1346 – लक्झेंबर्गच्या चतुर्थ चौथ्याला रोमन साम्राज्याचा शासक म्हणून नियुक्त केले गेले.
1673 – नेदरलँड्स आणि डेन्मार्क यांच्यामधील संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली.
1674 – छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी सोबत मित्रत्वाचा तह केला.
1690 – ऑरेंजच्या विल्यमच्या नेतृत्वात प्रोटेस्टंट्सनी रोमन कॅथोलिक सैन्यांचा पराभव केला.
1801 – अल्जेरियसच्या युद्धात ब्रिटनने फ्रान्स आणि स्पेनचा पराभव केला.
1823 – भारतात बांधले गेलेले पहिले वाष्प इंजन युक्त जहाज ‘डायना’ कलकत्ता येथे जलावतरण करण्यात आले.
1912 – ‘क्वीन एलिझाबेथ’ अमेरिकेत प्रदर्शित होणारा पहिला परदेशी चित्रपट ठरला.
1918 – टोकायमाच्या आखातीमध्ये जपानी युद्धनौकाचा स्फोट झाल्यावर 500 ठार झालेत.
1920 – पनामा कालव्याचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आलं. कारण, तो कालवा यापूर्वीच वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला होता.
1949 – जानेवारी 1948 मध्ये नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघवर (RRS) घातलेली निर्बंध या दिवशीच सशर्तपणे काढून टाकली गेली.
1982 – ग्रामीण भागातील कृषी आणि इतर आर्थिक उपक्रमांसाठी पतपुरवठा क्षेत्रात धोरण नियोजन आणि कार्यवाही करिता, नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) बँकेची स्थापणा केली.
1995 – भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कारने गौरविण्यात आलं.
1999 – साली माजी भारतीय क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2001 – साली कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला.