11 जुलै दिन विशेष

11 जुलै दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

             आज जागतिक लोकसंख्या दिन – लोकसंख्या वाढीचे होणारे दुष्परिणाम लोकांना पटवून देउन जनजागृत करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. 1989 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमाच्या सभेत 11 जुलै हा दिवस जगातिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले.
_____________________________________________

11 जुलैला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1889 – महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार, चित्रपट कथालेखक व सालीब संपादक नारायण हरि आपटे यांचा जन्मदिन.

11 जुलैला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1630 – कलकत्ता शहरात आलेली पहिली विदेशी महिला बेगम रेजाबिबेह सुकिएस यांचे निधन.
1912 – फ्रेंच नेत्र रोग विशेषज्ञ फर्डिनेंड मोनॉयर (Ferdinand Monoyer) यांचे निधन.
1994 – साली परमवीर चक्र पुरस्कार प्राप्त भारतीय सैन्य अधिकारी मेजर रामा राघोबा राणे यांचे निधन.
2003 – पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक, नाटककार आणि अभिनेते भीष्म साहनी यांचे निधन.
2003 – प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कादंबरीकार, गुप्तकथा व लघुकथा लेखक तसचं, वृत्तपत्र स्तंभ व कविता लेखक सुहास शिरवळकर यांचे निधन.
2009 – साली महाराष्ट्रीयन मराठी भावगीत गायक व कवी शांताराम नांदगावकर यांचे निधन.

11 जुलै महत्वपूर्ण घटना

1859 – लंडनच्या क्लॉक टॉवरची ‘बिग बेन’ बेल प्रथमच वाजविली गेली.
1908 – लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची शिक्षा होऊन त्यांना मंडालेच्या तुरुंगात कैद केल गेलं
1950 – पाकिस्तान देश आंतरराष्ट्रीय नाणे निधी संघटनेचा सदस्य बनला.
1979 – अमेरिकेची अंतराळ प्रयोगशाळा स्कायलॅब हिंदी महासागरात कोसळली.
1994 – दिल्लीच्या पोलीस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमॅन मॅगसेस पुरस्कार जाहीर करण्यात आला.
2001 – आगरतळा ते ढाका शहरादरम्यान बस सेवा सुरु करण्यात आली.
2006 – मुंबई मध्ये लोकल रेल्वेत बॉम्बस्फोट घडून सुमारे 209 लोक मृत्युमुखी पडले.
2010 – साली स्पेन देशाने नेदरलँड्स फुटबॉल संघाचा पराभव करून फुटबॉल विश्वचषक जिंकला.