09 ऑगस्ट दिन विशेष

09 ऑगस्ट दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

09 ऑगस्टला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1631 – इंग्लंड देशांतील पहिले कवी पुरस्कार विजेते इंग्रज कवी, साहित्यिक समीक्षक, अनुवादक आणि नाटककार जॉन ड्राइडन यांचा जन्मदिन.
1754 – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचा जन्मदिन.
1776 – इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचा जन्मदिन.
1876 – ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड लिटन द्वितीय यांचा जन्मदिन.
1890 – महाराष्ट्रीयन मराठी नाट्यसृष्टीतील संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जन्मदिन.
1891 – सयुक्त प्रांताचे माजी राज्यपाल फ्रान्सिस वर्नर वाईली यांचा जन्मदिन.
1893 – पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी कादंबरीकार, संपादक आणि गद्य लेखक शिवपूजन सहाय यांचा जन्मदिन.
1909 – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्मदिन.
1920 – घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी कृ. ब. निकुम्ब यांचा जन्मदिन.
1933 – साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदी लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक व कादंबरीकार मनोहर श्याम जोशी यांचा जन्मदिन.
1937 – मॉरिशस येथील पसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार अभिमन्यू अनंत यांचा जन्मदिन.
1975 – प्रसिद्ध भारतीय तेलगु भाषिक चित्रपट अभिनेते व निर्माता तसचं जी. महेश बाबू एन्टरटेन्मेंट प्रा. लि. प्रोडक्शन हाऊसचे मालक महेश बाबू यांचा जन्मदिन.
सन १९९१ साली भारतीय तमिळ चित्रपट अभिनेत्री हंसिका मोटवानी यांचा जन्मदिन.

09 ऑगस्टला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

117 – रोमन सम्राट ट्राजान यांचे निधन.
1107 – जपानी सम्राट होरिकावा यांचे निधन.
1901 – मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचे निधन.
1948 – हुगो बॉस कानी चे संस्थापक हुगो बॉस यांचे निधन.
1962 – नोबल पारितोषिक पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध जर्मन स्विस कवी, कादंबरीकार आणि चित्रकार हर्मन कार्ल हेसे यांचे निधन.
1970 – ब्रिटीश कालीन भारतात तीस वर्ष तुरुंगवास भोगणारे प्रख्यात भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते व राजकारणी त्रिलोकनाथ चक्रवर्ती यांचे निधन.
1976 – ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचे निधन.
1996 – जेट इंजिन चे शोधक फ्रॅंक व्हाटलेट यांचे निधन.
2002 – पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रांचे प्रख्यात अभ्यासक राम किंकर उपाध्याय यांचे निधन.
2002 – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचे निधन.
2016 – प्रसिद्ध भारतीय राजकारणी व अरुणाचल प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचे निधन.

09 ऑगस्टच्या महत्वपूर्ण घटना

1173 – पिसाच्या मनोर्‍याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.
1892 – थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.
1925 – चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
1942 – ब्रिटीश कालीन भारतात छोडो भारत आंदोलनाच्या वेळी चाले जाव असा नारा दिल्याप्रकरणी महात्मा गांधी यांना अटक करण्यात आलं.
1945 – अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.
1965 – मलेशिया राष्ट्रातून बाहेर काढल्यागेल्यामुळे सिंगापूर देशाला स्वातंत्र्य मिळालं. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
1974 – वॉटरगेट प्रकरण; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.
1993 – छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.
1996 – पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार तसचं, भारतरत्न पुरस्कार सन्मानित जगप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी नियुक्ती करण्यात आली.
2000 – भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.
2005 – अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे डिस्कव्हरी हे मानवरहित अंतराळ यान चौदा दिवसांच्या साहसी आणि धोकादायक प्रवासानंतर कॅलिफोर्नियास्थित एअरबेसवर सुरक्षितपणे उतरले.