08 जानेवारी दिन विशेष

08 जानेवारी दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

08 जानेवारीला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1909 – ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म.
1924 – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी यांचा जन्म.
1925 – हिंदी नाटककार राकेश मोहन यांचा जन्म.
1926 – प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचा जन्म.
1929 – अभिनेता सईद जाफरी यांचा जन्म.
1935 – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एल्व्हिस प्रिस्टले यांचा जन्म.
1936 – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ज्योतिंद्रनाथ दिक्षीत यांचा जन्म.
1942 – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक स्टिफन हॉकिंग यांचा जन्म.

08 जानेवारीला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1642 – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचे निधन.
1825 – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक एली व्हिटनी यांचे निधन.
1884 – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचे निधन.
1941 – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचे निधन.
1966 – प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचे निधन.
1967 – प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचे निधन.
1973 – सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक ना. भि. परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर यांचे निधन.
1973 – तत्वज्ञ आणि विचारवंत स. ज. भागवत यांचे निधन.
1984 – पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय यांचे निधन.
1992 – आनंद मासिकाचे माजी संपादक दं. प्र. सहस्रबुद्धे यांचे निधन.
1994 – 68वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती यांचे निधन.
1995 – समाजवादी विचारवंत मधु लिमये यांचे निधन.

08 जानेवारीच्या महत्वपूर्ण घटना

1835 – अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.
1880 – सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
1889 – संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.
1940 – दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
1947 – राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.
1957 – गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली.
1963 – लिओनार्डो डा व्हिन्सि यांच्या मोनालिसा चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
2000 – लता मंगेशकर यांची 1999 सालाकरिता एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
2001 – भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.