08 ऑगस्ट दिन विशेष

08 ऑगस्ट दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

08 ऑगस्टला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1078 – जपानी सम्राट होरिकावा यांचा जन्मदिन
1879 – अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे सहसंस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचा जन्मदिन.
1902 – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचा जन्मदिन.
1908 – संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीत गायिका सिद्धेश्वरी देवी यांचा जन्मदिन.
1912 – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचा जन्मदिन.
1915 – पद्मभूषण पुरस्कार, साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखक, नाटककार आणि अभिनेते भीष्म साहनी यांचा जन्मदिन.
1932 – सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक, व पटकथा लेखक दादा कोंडके यांचा जन्मदिन.
1940 – माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा जन्मदिन.
1948 – भारतीय राजकारणी व राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य कपिल सिब्बल यांचा जन्मदिन.
1949 – भारतीय राजकारणी व ओडिशा राज्यातील बिजू जनता दला पक्षाचे सदस्य तथा राज्यसभा सदस्य प्रसन्ना आचार्य यांचा जन्मदिन.
1950 – प्लेस्टेशन चे निर्माते केन कुटारगी यांचा जन्मदिन.
1981- स्विस व्यावसायिक टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यांचा जन्मदिन.
1968 – भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ऍबे कुरिविला यांचा जन्मदिन.
1981 – स्विस लॉन टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यांचा जन्मदिन.

08 ऑगस्टला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1827 – ब्रिटीश राजकारणी व ब्रिटनचे माजी पंतप्रधान जॉर्ज कॅनिग यांचे निधन.
1897 – जर्मन रसायनशास्त्रज्ञ विक्टर मेयर यांचे निधन.
1998 – वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्‍या लेखिका व कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे निधन.
1999 – सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचे निधन.
2000 – भारतातील कर्नाटक इथील एकीकरण चळवळीत महत्वाची भूमिका बजावणारे कर्नाटकचे ज्येष्ठ राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांचे निधन.

08 ऑगस्टच्या महत्वपूर्ण घटना

1509 – महाराज कृष्णदेव राय विजय नगर साम्राज्याचे सम्राट बनले.
1908 – विलब राइट यांनी पहिले उड्डाण केले.
1942 – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.
1947 – पाकिस्तान देशाने आपल्या राष्ट्रध्वज स्वीकारला.
1948 – स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खळत-बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी सपशेल पराभव केला.
1967 – इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.
1985 – भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.
1994 – पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय सुरू केले.
1997 – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
2000 – महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ‘महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार’ पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर
2008 – चीनमधील बिंजिंग येथे येथे 29व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.