07 जानेवारी दिन विशेष

07 जानेवारी दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

07 जानेवारीला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1892 – क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचा जन्म.
1893 – स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म.
1920 – लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म.
1921 – अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म.
1948 – विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.
1961 – अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.
1967 – सुप्रसिद्ध भारतीय अभिनेते इरफान खान यांचा जन्म.
1979 – हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासू यांचा जन्म.

07 जानेवारीला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1989 – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचे निधन.
2000 – विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.

07 जानेवारीच्या महत्वपूर्ण घटना

1610 – गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
1680 – मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
1789 – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.
1922 – पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
1927 – न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
1935 – कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले.
1959 – क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
1968 – अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
1972 – कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
1978 – एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका 69 कर्मचार्‍यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.