07 ऑगस्ट दिन विशेष

07 ऑगस्ट दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

07 ऑगस्टला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1831 – चर्च ऑफ इंग्लंडचे एक मौल्यवान, शालेय शिक्षक आणि लेखक तसचं, केंब्रिज अ‍ॅपोस्टल्स सीक्रेट सोसायटीचे सदस्य फ्रेडरिक फरार यांचा जन्मदिन.
1871 – प्रसिद्ध भारतीय जलरंग चित्रकार, रवींद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्र नाथ टागोर यांचा जन्मदिन.
1876 – हिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचा जन्मदिन.
1904 – प्रसिद्ध भारतीय इतिहास, सांस्कृतिक कला व साहित्याचे विद्वान वासुदेव शरण अग्रवाल यांचा जन्मदिन.
1912 – भारतीय हृदयरोगाचे प्रणेते व मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे संचालक तसचं, ऑल इंडिया हार्ट फाउंडेशनचे संस्थापक संचालक केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्मदिन.
1925 – पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिन.
1936 – दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते डॉ. आनंद कर्वे यांचा जन्मदिन.
1966 – विकिपीडियाचे सह-संस्थापक जिमी वेल्स यांचा जन्मदिन.

07 ऑगस्टला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1934 – जॅक्वार्ड लूम चे शोधक जोसेफ मॅरी जाकॉर्ड यांचे निधन.
1941 – रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन
1947 – हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या भेंडीबाजार घराण्याच्या गायिका अंजनीबाई मालपेकर यांचे निधन
1948 – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस यांचे निधन.
2009 – भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील गीतकार आणि अभिनेते गुलशन बावरा यांचे निधन.

07 ऑगस्टच्या महत्वपूर्ण घटना

1753 – ब्रिटीश वस्तुसंग्रहालयाची स्थापना करण्यात आली.
1789 – अमेरिकेतील सरकारी युद्ध विभागाची स्थापना करण्यात आली.
1942 – दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्‍या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
1947 – मुंबई महानगरपालिकेने बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
1947 – थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात 7000 किमी प्रवास केला.
1981 – सलग 128 वर्षे प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले.
1985 – जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चीकी मुकाई यांची निवड केली गेली.
1985 – भारतीय बिलियर्डस खेळाडू गीत सेठी हे वर्ल्ड अ‍ॅमेच्योर बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारे तिसरे भारतीय खेळाडू ठरले.
1987 – अमेरिका ते सोव्हिएत संघ पोहून पार करणारे लिन कॉक्स हे पहिले व्यक्ती बनले.
1990 – गल्फ युद्ध साठी पहिले अमेरिकन सैनिक सौदी अरेबियात पोहोचले.
1991 – जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची
श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली.
1997 – चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिट्टोरिओ डी सिका हा सन्मान जाहीर.
2000 – ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.