04 ऑगस्ट दिन विशेष

04 ऑगस्ट दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

04 ऑगस्टला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1522 – साली मेवाड राजघराण्यातील 12 वे शासक व राजस्थान राज्यातील उदयपुर शहराचे संस्थापक तसचं, महाराणा प्रताप यांचे वडिल राणा उदय सिंह यांचा जन्मदिन.
1730 – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म.
1821 – लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिटोन यांचा जन्म.
1834 – प्रसिद्ध ब्रिटीश गणितज्ञ, तर्कशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ जॉन व्हेन यांचा जन्मदिन.
1845 – ब्रिटीश कालीन भारतातील कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक सर फिरोजशाह मेरवणजी मेहता यांचा जन्मदिन.
1863 – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म.
1888 – भारतीय धर्मगुरू ताहेर सैफुद्दीन यांचा जन्म.
1894 – प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक नारायण सीताराम फडके यांचा जन्मदिन.
1929 – सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट संगीत पार्श्वगायक, अभिनेता, संगीत दिग्दर्शक, गीतकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आभास कुमार गांगुली उर्फ किशोर कुमार यांचा जन्मदिन.
1931 – माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू नरेल ताम्हाणे यांचा जन्मदिन.
1950 – भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी यांचा जन्म.
1961 – अमेरिकेचे 44 वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा यांचा जन्म.

04 ऑगस्टला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

221 – चीनी सम्राज्ञी लेडी जेन यांचे निधन.
1060 – फ्रान्सचा राजा हेन्‍री (पहिला) यांचे निधन.
1875 – डॅनिश परीकथा लेखक, प्रवासी कादंबरीकार हैंस क्रिश्चियन एंडर्सन यांचे निधन.
1937 – प्रसिद्ध भारतीय इतिहासकार आणि आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ काशीप्रसाद जयस्वाल यांचे निधन.
1939 – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचे निधन.
1977 – नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट एडगर अ‍ॅड्रियन यांचे निधन.
1997 – 122 वर्षे आणि 164 दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचे निधन.
2003 – नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स यांचे निधन.
2006 – भारतीय राजकारणी व लेखिका तसचं, ओडिसा राज्याच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांचे निधन.

04 ऑगस्टच्या महत्वपूर्ण घटना

1666 – नेदरलँड्स (डच) आणि इंग्लंड देशांत झालेल्या समुद्री युद्धात इंग्रज सैन्यांनी विजय मिळविला.
1870 – युद्धाच्या वेळी आजारी व जखमी सैनिकांना मदत करण्यासाठी लंडन या देशांत ब्रिटीश रेड क्रॉस सोसायटीची स्थापना करण्यात आली.
1875 – डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन यांचे निधन.
1886 – कोलंबिया देशाच्या राज्यघटनेनुसार कोलंबिया चे नाव बदलून अमेरिका करण्यात आले तेव्हा त्यांनी नवीन संविधान स्वीकारले.
1914 – पहिल्या महायुद्धा दरम्यान जर्मनीने बेल्जियम देशाविरुद्ध तर ब्रिटन ने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.
1935 – ब्रिटीश सरकारने गवर्नमेंट ऑफ इंडिया ऐक्ट ला मंजुरी दिली.
1937 – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचे निधन.
1947 – जपान देशांत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
1956 – देशांतील पहिली भाभा अणु संशोधन अणुभट्टी अप्सरा महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हाच्या तारापूर या ठिकाणी सुरु करण्यात आली.
1967 – तेलंगाना राज्यातील कृष्ण नदीवर बांधण्यात आलेला जगातील सर्वात लांब दगडी नागार्जुन सागर धरणाचे उद्घाटन करण्यात आलं.