03 जानेवारी दिन विशेष

03 जानेवारी दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

03 जानेवारीला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1938 – भारताचे माजी अर्थमंत्री मेजर जसवंत सिंग जासोल यांचा जन्म.
1831 – पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म.
1883 – इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांचा जन्म.
1921 – हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म.
1931 – मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म.

03 जानेवारीला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1903 – अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील अ‍ॅलॉइस हिटलर यांचे निधन.
1994 – मराठी बालकुमार लेखक अमरेंद्र गाडगीळ यांचे निधन.
1998 – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचे निधन
2000 – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री सुशीला नायर यांचे निधन.
2002 – इस्रोचे माजी अध्यक्ष आणि अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचे निधन.

03 जानेवारीच्या महत्वपूर्ण घटना

1496 – लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.
1925 – बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.
1947 – अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
1950 – पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.
1952 – स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
1957 – हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
2004 – नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.