03 ऑगस्ट दिन विशेष

03 ऑगस्ट दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

03 ऑगस्टला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1886 – हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्मदिन.
1889 – सुप्रसिद्ध भारतीय आधुनिक हिंदी नाटककार, कवी, कादंबरीकार व लेखक उदयशंकर भट्ट यांचा जन्मदिन.
1900 – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म.
1916 – गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा जन्मदिन.
1924 – अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचा जन्मदिन.
1936 – पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या घराण्यातील शास्त्रीय ठुमरी गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचा जन्मदिन.
1956 – माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू बलविंदर संधू यांचा जन्मदिन.
1960 – माजी भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्मदिन.
1984 – पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू व कर्णधार सुनील छेत्री यांचा जन्मदिन.
1937 – फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेता स्पॅनिश टेनिसपटू आंद्रेस गिमेनो टोलागिरा यांचा जन्मदिन.

03 ऑगस्टला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1792 – औद्योगिक क्रांतीच्या काळातील अग्रणी इंग्रज शोधक व उद्योजक रिचर्ड आर्कराईट यांचे निधन.
1908 – पटना येथील खुदाबक्श ग्रंथालयाचे संस्थापक मौलवी खुदाबक़्श खान यांचे निधन.
1929 – फोनोग्राफ चे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन.
1930 – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन.
1957 – पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधी यांचे पुत्र व प्रसिद्ध पत्रकार देवदास गांधी यांचे निधन.
1993 – उत्तरप्रदेश मधील हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रीय सदस्य व क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांचे निकटवर्तीय प्रेम किशन खन्ना यांचे निधन.
1993 – भारतीय हिंदू अध्यात्म नेते आणि अद्वैत वेदांत, भगवद्गीता, उपनिषद प्रसारक स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन.
2007 – लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन.
2020 – आयरिश नोबेल पीस पुरस्कार विजेते राजकारणी जॉन ह्यूम यांचे निधन

03 ऑगस्टच्या महत्वपूर्ण घटना

1492 – इटालियन खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस हे आपल्या तीन जहाजांसह स्पेनहून भारताच्या शोधात निघाले.
1783 – जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे 35000 जण मृत्यूमुखी पडले.
1900 – अमेरिकन टायर कंपनी ‘द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना करण्यात आली.
1914 – बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.
1936 – आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
1948 – भारतीय अणूऊर्जा आयोगाची स्थापना झाली.
1960 – नायजेरिया देशाला फ्रांस देशाकडून स्वातंत्र्य मिळालं.
1985 – प्रसिद्ध भारतीय समाजसेवक व सक्रीय कार्यकर्ते बाबा आमटे यांना सार्वजनिक सेवेसाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1994 – संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
1994 – सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.
2000 – मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
2004 – राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.
2004 – अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपला मैसेंजर हा उपग्रह बुध ग्रहाकडे प्रक्षेपित केला.