02 जानेवारी दिनविशेष

02 जानेवारी दिन विशेष, जन्मदिवस, जयंती, वाढदिवस, मृत्यू, पुण्यतिथी,स्मृतिदिन, महत्वपूर्ण घटनांंची माहिती पाहुया…..

_____________________________________________

 

02 जानेवारीला झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

1932 – भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते जॉनी बक्षी यांचा जन्म.
1920 – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचा जन्म.
1959 – भारीतय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म.
1960 – भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म.

02 जानेवारीला झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन

1316 – दिल्लीचे सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांचे निधन.
1935 – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन.
1943 – हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.
1944 – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन.
1952 – व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.
1989 – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन.
1999- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन.
2015 – भारतीय हवामान शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन.
2016 – भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी सरचिटणीस आणि स्वातंत्र्यसेनानी अर्धेन्दू भूषण बर्धन यांचे निधन.

02 जानेवारीच्या महत्वपूर्ण घटना

1757 – प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
1881 – लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
1885 – पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.
1905 – मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला.
1936 – मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
1942 – दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.
1945 – दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले.
1951 – रशियाने ल्युना 1 हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
1954 – राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.
1985 – पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.
1989 – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या.
1998 – डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली.
2000 – संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
2000 – पनामा सरकारने 85 वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.