सामान्य नागरिकांना ‘टूर ऑफ ड्यूटी’ योजना’ देण्याचा लष्कराचा विचार सुरु.

0

सामान्य नागरिकांना ‘टूर ऑफ ड्यूटी’ योजना’ देण्याचा लष्कराचा विचार सुरु.

दिल्ली – देशातील सामान्य नागरिकांना लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा विचार लष्कराच्या विचाराधीन आहे. ‘टूर ऑफ ड्यूटी’ या योजनेद्वारे तरुणांना 3 वर्षे भारतीय लष्करात सेवा करण्याची संधी मिळू शकते. सध्या याबाबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. लष्कराच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘सामान्य नागरिकाला देशसेवा करण्यासाठी टूर ऑफ ड्यूटी हा तीन वर्षांचा कार्यकाळ देण्याचा प्रस्ताव लष्कराने मांडला असून, त्याबाबत चर्चा करण्यात येत आहे,’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लष्कराला सध्या अधिकाऱ्यांची कमतरता जाणवत आहे त्यामुळे तरुणांना लष्कराकडे आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. लष्कर देशातील प्रतिभावान युवकांना आकर्षित करू इच्छित आहे. त्यासाठी ही नवीन योजना राबवली जाणार आहे. शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) च्या माध्यमातून 10 वर्षांसाठी युवकांना लष्करात सामिल होण्याची संधी दिली जात आहेच. अशाच पद्धतीची नवीन पद्धत राबविण्याचा हा प्रस्ताव आहे. आणि यामुळे खूप तरुण उमेदवारांना यांचा फायदा होईल.

प्रस्ताव मान्य झाल्यास टूर ऑफ ड्यूटी अंतर्गत निवडलेल्यांना तीन वर्षांसाठी लष्करात सेवा देता येणार आहे. सरकार सामान्य नागरिकांना तीन वर्षांसाठी लष्करात सामिल करून घेण्याच्या प्रस्तावावर सध्या विचार करत आहे. त्याचाच हा प्रस्ताव असल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

या आधीही ‘शॉर्ट सर्व्हिस कमीशन’अंतर्गत तरुण लष्करात सेवा करू शकत होते. तो कार्यकाळ पहिल्यांदा 5 वर्षांचा होता तो वाढवून 10 वर्षांचा केला गेला. या नव्या योजनेच्या माध्यमातून नव्या कौशल्यवान तरुणांना हेरून त्यांना लष्करात समावून घेण्याचा प्रयत्नही लष्करी अधिकारी करणार आहेत. कमी काळासाठी लष्करात सेवा बजावण्याच्या योजनांकडे तरुणांना आकर्षित करणारे बदल करून त्या त्यांच्यासमोर मांडण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here