लॉकडाऊन वाढण्याचे संकेत ? माहिती 18 मे पुर्वी देणार…20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा

0

लॉकडाऊन वाढणार का ?  माहिती 18 मे पुर्वी देणार पॅकेजची घोषणा 

रोना संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने 1.79 लाख कोटींची तरतूद केली होती. त्यामध्येच आज वाढ करत नरेंद्र मोदींनी एकूण 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. हागणदारीमुक्त भारत, कुपोषणमुक्त भारत, स्वच्छ भारत, टीबीमुक्त भारत या गोष्टी जेव्हा भारत पुढे आणतो त्यावेळी जग भारताकडे अभिमानाने बघत असतो या जुन्याच पारंपरिक उदाहरणांचा दाखला मोदी यांनी यावेळी दिला.

नरेंद्र मोदी - प्रधानमंत्री

     गुलामगिरीतील भारत आता विकासाकडे निघाला असून या प्रवासातही भारताने विश्वकल्याणाचा मार्ग अवलंबला असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. जगात ज्या गोष्टी सुधारण्यासाठी भारतीयांची गरज लागेल त्या गोष्टींसाठी भारत नेहमीच सज्ज राहील हे सांगत असताना नरेंद्र मोदींनी कच्छच्या भूकंपाची आठवण करुन दिली

कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. अतापर्यंत 3 लाखच्या वर ह्या व्हायरसनं लोकंचा बळी घेतला. ह्या भारतात देखील काही राज्यात कोरोनाचा हाहाकार चालू आहे. 42 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनामुळे संक्रमित झाले आहेत.आणि बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतं आहे. अशा परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. 17 मे पर्यंत लॉकडाऊन चालू आहे. आपण सध्या लॉकडाऊन-3 मध्ये आहोत. लॉकडाऊन 4 चे संकेत या भाषणात नरेंद्र मोदी यांंनी दिले, लॉकडाऊन 4 बद्दल 18 मे पुर्वी आपल्याला माहिती देण्यात येईल असे यांनी सांगितले आहे.

नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही असे संकट ना पाहिलेय नाही ऐकले. हे कल्पनेपलिकडचे आहे. आम्हाला कोरोनाआधीच्या जगाला पाहता आले आहे. कोरोना नंतरही जगाला पाहता येणार आहे. दोन्ही कालखंडाकडे पाहिल्यास एकविसावे शतक भारताचे असावे, यासाठी आपली जबाबदारी आहे, असे मोदी यांनी सांगितले.

जेव्हा कोरोना संकट सुरु झाले तेव्हा भारतात एकही पीपीई किट बनत नव्हती. एन-९५ मास्कचे नाममात्रच उत्पादन होत होते. आज भारतात रोज दोन लाख PPE आणि मास्क बनविले जाऊ लागले आहेत. संकटाला संधीमध्ये बदलण्यात आले आहे. हे भारताला ताकदवान बनविण्यास मदत करणार आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. भारत जेव्हा स्वावलंबी होण्याची गोष्ट करतो, तेव्हा त्याची वकीली करत नाही. जी संस्कृती जगाचा विकास करू इच्छिते. जगाला घर मानते. भारताच्या कामाचा प्रभाव जगाच्या कल्याणावर पडतो. टीबी असेल, हागणदारी मुक्ती असेल जगावर त्याचा परिणाम झाला आहे. तणावातून मुक्ती देण्यासाठी भारताकडून जगाला भेट मिळाली आहे. जगाला विश्वास वाटू लागला आहे, भारत काही चांगले करू शकतो. पण प्रश्न आहे कसा? यावर उत्तर आहे १३५ कोटी लोकांनी केलेला स्वावलंबीपणाचा संकल्प यावर उत्तर आहे, असे मोदी म्हणाले.

आम्ही भारतातील तंत्रज्ञान सुधारु, मालवाहतूक सुधारू, दर्जेदार उत्पादने घेऊ. कच्छचा भूकंप पाहिलाय. काही उरले नव्हते, तरीही कच्छ पुन्हा उभे राहिले. भारत स्वावलंबी बनू शकतो. ही इमारत पाच खांबावर उभी राहील. पहिला खांब अर्थव्यवस्था. दुसरा खांब इन्फ्रास्ट्रक्चर, तिसरा खांब आपली व्यवस्था तीही तंत्रज्ञानावर आधारीत, चौथा खांब लोकसंख्याशास्त्र आणि पाचवा खांब मागणी. यावर काम करावे लागणार आहे. या सर्व खांबांना आपण मजबूत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याचबरोबर विशेष आर्थिक पॅकेजची घोषणेमुळे स्वावलंबी भारत मोहिमेसाठी हे पॅकेज काम करेल. गेल्या काळात आर्थिक पॅकेज दिले होते. त्याला आणि आजच्या पॅकजला जोडले तर जवळपास 20 लाख कोटी रुपयांचे आहे. भारताच्या जीडीपीच्या जवळपास 10 टक्के आहे. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार यावर लक्ष देऊन बनविण्यात आले आहे. यामध्ये कुटीर उद्योग, लघू, मध्यम उद्योग यासाठी आहे. हे पॅकेज देशाच्या श्रमिक, शेतकऱ्यासाठी आहे, असे मोदींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here